मालगाडीवर सेल्फी घेताना भाजलेल्या तरुणाचा अखेर मृत्यू

25 हजार व्होल्ट करंट असलेल्या ओव्हरहेड वायरचा शॉक लागल्यामुळे 17 वर्षीय तरुणाचा अक्षरशः कोळसा झाला. अंबरनाथमध्ये राहणाऱ्या अनिकेत थोरातच्या मृत्यूसाठी ओव्हरहेड वायर नव्हे, तर जीवघेण्या सेल्फीचा नाद कारणीभूत ठरला आहे.

मालगाडीवर सेल्फी घेताना भाजलेल्या तरुणाचा अखेर मृत्यू

अंबरनाथ : मालगाडीवर चढून सेल्फी घेणं अखेर अंबरनाथच्या तरुणाच्या जीवावर बेतलं आहे. या घटनेत भाजलेल्या 17 वर्षीय अनिकेत थोरात या तरुणाचा अखेर उपचारांदरम्यान मृत्यू झाला.

25 हजार व्होल्ट करंट असलेल्या ओव्हरहेड वायरचा शॉक लागल्यामुळे 17 वर्षीय तरुणाचा अक्षरशः कोळसा झाला. अंबरनाथमध्ये राहणाऱ्या अनिकेत थोरातच्या मृत्यूसाठी ओव्हरहेड वायर नव्हे, तर जीवघेण्या सेल्फीचा नाद कारणीभूत ठरला आहे.

अंबरनाथच्या बुवापाड्यात राहणारा अनिकेत काल दुपारी टाईमपास करण्यासाठी रेल्वे यार्ड परिसरात आला होता. त्यावेळी तिथे मालगाडी उभी होती. अनिकेतने गार्डच्या केबिनमध्ये चढून सेल्फी घेण्याचा प्रयत्न केला. मात्र गार्डने त्याला हुसकावून लावलं. त्यानंतर सेल्फी काढण्यासाठी अनिकेत मालगाडीच्या टपावर चढला. सेल्फी काढताना तो ओव्हरहेड वायरच्या संपर्कात आला आणि जोराचा शॉक लागल्यामुळे तो खाली कोसळला.

जखमी अनिकेत थोरातला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

अनिकेत थोरातप्रमाणे याआधी देखील अनेकांनी सेल्फीच्या नादापायी आपला जीव धोक्यात टाकल्याच्या घटना घडल्या आहेत. मध्यतंरी सेल्फी काढण्याच्या नादात गर्भवती महिला सिंहगडावरून कोसळली. तिचं नशीब बलवत्तर म्हणून ती थोडक्यात बचावली. तर धबधब्यावर सेल्फी काढताना तोल गेल्यामुळे अनेकांनी आपला जीव गमावला आहे.

हटके सेल्फी घेण्यासाठी स्काय टॉवरची टेरेस गाठण्याचं फॅडच परदेशात आलं होतं. अशा प्रकारचे व्हीडिओ यूट्यूबवर अपलोड करून पैसे कमवण्यासाठी तरुण-तरुणी आपले जीव धोक्यात घालतात. मात्र क्षणभंगुर सेल्फीपेक्षा लाखमोलाचं आयुष्य महत्त्वाचं आहे, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV