चटणीच्या गरम भांड्यात पडून चिमुकलीचा मृत्यू

दीड वर्षांची तनुष्का खेळता खेळता चटणीच्या टोपाजवळ गेली. तोल गेल्यामुळे तनुष्का चटणीच्या भांड्यात पडली

चटणीच्या गरम भांड्यात पडून चिमुकलीचा मृत्यू

अंबरनाथ : चटणीच्या गरम भांड्यातून पडल्यामुळे दीड वर्षांच्या चिमुकलीला जीव गमवावा लागला. 80 टक्के भाजलेल्या तनुष्काचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अंबरनाथमध्ये घडलेल्या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

तनुष्काचे वडील रामास्वामी अंबरनाथमधील शास्त्रीनगर परिसरात राहतात. त्यांचा इडली सांबार विक्रीचा व्यवसाय आहे. रोजप्रमाणे रामास्वामी यांनी मंगळवारी सकाळीही साडेपाच वाजता इडलीसोबत लागणारी टॉमेटोची चटणी तयार करुन एका टोपात भरुन ठेवली होती.

दीड वर्षांची तनुष्का खेळता खेळता चटणीच्या टोपाजवळ गेली. तोल गेल्यामुळे तनुष्का चटणीच्या भांड्यात पडली. टॉमेटोची चटणी  गरम असल्यामुळे ती 80 टक्के भाजली.

त्याच अवस्थेत तनुष्काला उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान तनुष्काचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिससारत हळहळ व्यक्त होत आहे.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Ambernath : Baby killed after falling in hot tomato chutney latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV