अंबरनाथमध्ये पोलिसाचा सहकारी पोलिसाच्या पत्नीवर बलात्कार

मित्राच्या अनुपस्थितीत घरी जाऊन त्याच्या पत्नीवर चाकूच्या धाकाने बलात्कार केल्याचा आरोप पोलिसावर आहे.

अंबरनाथमध्ये पोलिसाचा सहकारी पोलिसाच्या पत्नीवर बलात्कार

अंबरनाथ : एका पोलिसाने सहकारी पोलिसाच्याच पत्नीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना अंबरनाथमध्ये घडली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी पोलिसाला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

पीडित महिला अंबरनाथच्या पूर्व भागातील रॉयल पार्क परिसरात राहते. तिचा पती आणि पतीचा मित्र असलेला आरोपी योगीराज वाघ हे दोघेही ठाणे ग्रामीण पोलिस दलात कार्यरत आहेत. या वर्षीच्या जानेवारी ते मे महिन्यादरम्यान आरोपी वाघने वारंवार मित्राच्या पत्नीला फोन करुन त्रास दिल्याचा आरोप आहे.

मित्राच्या अनुपस्थितीत घरी जाऊन त्याच्या पत्नीला चाकूचा धाक दाखवत बलात्कार केल्याचा आरोपही आहे. अखेर याबाबत पीडित महिलेने तक्रार दिल्यानंतर शिवाजीनगर पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला. आरोपी योगीराज वाघ हा सध्या भिवंडीजवळच्या पडघा पोलिस ठाण्यात कार्यरत असून त्याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

या प्रकरणाची चौकशी करुन कारवाई केली जाईल, असं अंबरनाथचे सहाय्यक पोलिस आयुक्त सुनिल पाटील यांनी सांगितलं. मात्र या प्रकाराने नागरिकांसह पोलीस दलातही खळबळ उडाली आहे.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV