अंबरनाथ पोलिसांकडून थर्टी फर्स्टला दूध वाटप

अंबरनाथ पोलिसांकडून यावेळी तब्बल 100 लिटर दूध वाटण्यात आलं.

अंबरनाथ पोलिसांकडून थर्टी फर्स्टला दूध वाटप

अंबरनाथ : थर्टी फर्स्टच्या निमित्ताने सगळीकडेच पार्ट्या रंगात आलेल्या असताना, अंबरनाथ पोलिसांनी मात्र लोकांना दूध वाटप करत दारुऐवजी दूध पिऊन तंदुरुस्त होण्याचं आवाहन केलं.

नववर्षाच्या स्वागताला अनेक जण मद्यपान करतात आणि तशाच अवस्थेत गाड्या चालवतात. यामुळे एकीकडे अपघातांची संख्या वाढत असतानाच दारुमुळे आरोग्यावरही विपरित परिणाम होतो. त्यामुळे अंबरनाथ पोलिसांनी पश्चिमेच्या विम्को नाक्यावर नाकाबंदी तर लावलीच, शिवाय बाजूलाच दूध वाटप केलं.

नाकाबंदीसाठी थांबलेल्या वाहनचालक आणि पादचाऱ्यांना पोलिस आग्रहाने दूध पाजत होते. दारुपासून दूर राहून दूध प्या आणि तंदुरुस्त राहा असा संदेश यावेळी पोलिसांनी दिला.

अंबरनाथ पोलिसांकडून यावेळी तब्बल 100 लिटर दूध वाटण्यात आलं.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Ambernath : Police distributes milk to people on 31st night
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV