संदीप कदमांची हाक शिवसेनेने ऐकली, दीड लाखांचा धनादेश

संदीप कदमांची हाक शिवसेनेने ऐकली, दीड लाखांचा धनादेश

अंबरनाथ : अंबरनाथमधील संदीप कदम या शिवसैनिकाची हाक अखेर शिवसेनेनं ऐकली आहे. ‘एबीपी माझा’नं दाखवलेल्या बातमीनंतर शिवसेनेनं संदीप कदम यांना दीड लाखांचा धनादेश पाठवला आहे.

2014 साली युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या अंबरनाथ दौऱ्यासाठी डेकोरेटर असलेल्या संदीप कदम यांनी मंडप आणि कमानी उभारल्या. त्याचं 3 लाख रुपयांचं बिल पक्षानं गेल्या 3 वर्षांपासून थकवलं होतं.

दरम्यानच्या काळात अर्धांगवायूनं संदीपही अंथरुणाला खिळले. घरचा खर्च भागवण्यासाठी त्यांच्या पत्नीला घरकामं करावी लागली.

संदीप कदम शिवसेनेचे कार्यकर्ते नाहीच, त्यांचा अंबरनाथमधील शिवसेनेशीही संबंध नाही. संदीप कदम असे आरोप करुन पक्षाला, माजी नगाध्यक्ष सुनील चौधरी आणि आमदार बालाजी किणीकर यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत असल्याचं सांगत शिवसेनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी हात झटकले होते.

‘एबीपी माझा’नं त्यांची ही परिस्थिती दाखवल्यानंतर शिवसेनेनं त्यांना मदत केली. शिवसेनेकडून संदीप कदम यांना दीड लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला आहे. संदीप यांनी एबीपी माझाचे आभार मानले आहेत.

काय आहे प्रकरण?

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे 2014 साली अंबरनाथ दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी कमानी आणि झेंडे लावून जोरदार शक्तीप्रदर्शन केलं होतं. याचं काम स्थानिक शिवसेना शाखेने संदीप कदम यांना दिलं होतं. पण दौरा झाल्यानंतर, याचं तब्बल तीन लाखांचं बिल पक्षाने थकवल्याने संदीप यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढला आहे.

यातच बिलासाठी चकरा मारताना संदीपला अर्धांगवायूचा झटका आला. त्यामुळं मागील वर्षभरापासून तो अंथरुणाला खिळून आहे. त्यामुळं तीन मुलींच्या पालनपोषण, शिक्षणासह घरखर्च भागवण्यासाठी संदीपच्या पत्नीला घरकाम करण्याची वेळ आली आहे.

संबंधित बातम्या :

‘तो’ शिवसैनिक नाही, संदीप कदम प्रकरणात शिवसेनेने हात झटकले

आदित्य ठाकरेंच्या स्वागतामुळं शिवसैनिकाच्या डोक्यावर कर्जाचा बोजा

First Published:

Related Stories

राज्यातील शेतकरी आंदोलनात नितीश कुमारही सहभागी होणार!
राज्यातील शेतकरी आंदोलनात नितीश कुमारही सहभागी होणार!

पाटणा : राज्यात सप्टेंबरमध्ये होणाऱ्या शेतकरी आंदोलनात बिहारचे

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 26/06/2017
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 26/06/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 26/06/2017 1. मान्सूनच्या प्रगतीतले अडथळे

पालघरमध्ये शिक्षकाचा दारु पिऊन शाळेसमोरच धिंगाणा
पालघरमध्ये शिक्षकाचा दारु पिऊन शाळेसमोरच धिंगाणा

पालघर : डहाणू तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील एका शिक्षकानं दारु

40 लाख कर्जमुक्त शेतकऱ्यांची यादी द्या : उद्धव ठाकरे
40 लाख कर्जमुक्त शेतकऱ्यांची यादी द्या : उद्धव ठाकरे

औरंगाबाद: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादेत

7 जिल्ह्यात 44 धाडी, 30 पंपांवर 'मापात पाप'
7 जिल्ह्यात 44 धाडी, 30 पंपांवर 'मापात पाप'

ठाणे: पेट्रोल पंपांवर हातचलाखी करुन मापात पाप करणाऱ्यांवर ठाणे

फीलिंग पीसफुल.. मृत्यूच्या तासभर आधी 'ती' फेसबुक पोस्ट
फीलिंग पीसफुल.. मृत्यूच्या तासभर आधी 'ती' फेसबुक पोस्ट

जम्मू काश्मिर : पृथ्वीवरचा स्वर्ग काश्मिर… आणि त्या स्वर्गाला चार

सांगलीत भाजप आणि काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी
सांगलीत भाजप आणि काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये...

सांगली : हरिपूर गावामध्ये भाजप आणि काँग्रेस-राष्ट्रवादीच्या

कोल्हापुरातील राजाराम बंधारा पाण्याखाली, मात्र तरीही वाहतूक सुरु
कोल्हापुरातील राजाराम बंधारा पाण्याखाली, मात्र तरीही वाहतूक सुरु

कोल्हापूर: कोल्हापुरात पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. धरण

महालक्ष्मी एक्स्प्रेसऐवजी अंबाबाई एक्सप्रेस करा, शिवसेनेची मागणी
महालक्ष्मी एक्स्प्रेसऐवजी अंबाबाई एक्सप्रेस करा, शिवसेनेची मागणी

कोल्हापूर : महालक्ष्मी एक्स्प्रेसचं नाव बदलून ते अंबाबाई

माणगावमध्ये नदीपात्रात अडकलेल्या 50 पर्यटकांना वाचवण्यात यश
माणगावमध्ये नदीपात्रात अडकलेल्या 50 पर्यटकांना वाचवण्यात यश

माणगाव: रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील देवकुंडनजीकच्या