स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे अंधारात तळपणारी वीज : अमित शाह

By: अक्षय भाटकर, एबीपी माझा, ठाणे | Last Updated: Friday, 21 April 2017 7:39 PM
स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे अंधारात तळपणारी वीज : अमित शाह

ठाणे : स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे अंधारात तळपणारी वीज असल्याचे गौरवोद्गार भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी काढले. 29 व्या अखिल भारतीय सावरकर साहित्य संमेलनाचं उद्घाटन ठाण्यात हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते.

सावरकर हे बहुआयामी व्यक्तीमत्त्व असल्याचं सांगून अमित शाह म्हणाले की, ”सावरकर हे गद्य आणि पद्य अशा दोन्हीमध्ये श्रेष्ठ होते. त्यांनी आपल्या साहित्याद्वारे येणाऱ्या पिढ्यांना दिशा दाखवण्याचे काम केलं. त्यामुळे त्यांची जे लोक निंदा करतात, त्यांनी एकदा तरी सावरकर वाचवे, म्हणजे त्यांना कळेल.”

अमित शाह यांनी यावेळी बोलताना काँग्रेसवर सडकून टीका केली. अमित शाह म्हणाले की, ”सावरकर यांच्या राष्ट्रभक्तीवर शंका उपस्थित करणाऱ्यांना, भविष्यात पिढ्या कधीच माफ करणार नाहीत. अटलजींच्या नेतृत्वातील भाजप सरकारने अंदमानमध्ये सावरकर ज्योती सुरु केली. पण कर्मदरिद्री यूपीए सरकारने ही ज्योती बंद केली. पुन्हा भाजप सरकार सत्तेत आल्यावर मी स्वत: ही ज्योत पुन्हा प्रज्वलित केली. सावरकरांच्या नावाने सुरु केलेली ही ज्योत नव्या पिढीसाठी सदैव प्रेरणादायी आहे.”

सावरकरांना मरणोत्तर भारतरत्न देण्यात यावी, अशी मागणी या संमेलनाच्यावतीने करण्यात येत आहे. त्यापार्श्वभूमीवर अमित शाह म्हणाले की, ”संपूर्ण भारतीयांनी सावरकरांना स्वातंत्र्यवीर ही पदवी दिली. त्यासाठी कशाचेही काही करावे लागले नाही.”

”सावरकरांचं व्यक्तिमत्त्व बहुआयामी होतं. ते  केवळ साहित्यापुरते मर्यादित नाहीत. त्यांचे विचार अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी आहेत. त्यामुळे त्यांचे विचार संपूर्ण देशाला कळावेत,” असं सांगून साहित्य संमेलनाच्या आयोजकांनी हे साहित्य सम्मेलन केवळ महाराष्ट्रातच नाही, तर संपूर्ण देशातही भरावे, अशी मागणी यावेळी केली.

यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार विनय सहस्त्रबुद्धे, संमेलनाध्यक्ष रमेश पतंगे यांच्यासह दिग्गजांची उपस्थिती होती. सावरकर साहित्य संमेलन हे तीन दिवस चालणार आहे.

First Published: Friday, 21 April 2017 7:39 PM

Related Stories

मुंबईसाठी लवकरच तळोजात नवीन डम्पिंग ग्राऊंड
मुंबईसाठी लवकरच तळोजात नवीन डम्पिंग ग्राऊंड

मुंबई : मुंबईतील देवनार आणि मुलुंड या कचराभूमीची कचरा साठवण्याची

'कटप्पा-बाहुबलीचं कोडं सुटलं, पण मुंबईकर ट्रफिकचे नियम का पाळत नाही?'
'कटप्पा-बाहुबलीचं कोडं सुटलं, पण मुंबईकर ट्रफिकचे नियम का पाळत नाही?'

मुंबई : मुंबईकरांमध्ये वाहतूक नियमांबाबत जनजागृती करण्यासाठी

मुंबईत कार-ट्रकचा भीषण अपघात, 9 जण गंभीर
मुंबईत कार-ट्रकचा भीषण अपघात, 9 जण गंभीर

मुंबई : मुंबईत मध्यरात्री दादर-माटुंगा फ्लायओव्हरवर स्कॉर्पिओ कार

मुंबईतील तिन्ही रेल्वे मार्गांवर आज मेगाब्लॉक
मुंबईतील तिन्ही रेल्वे मार्गांवर आज मेगाब्लॉक

मुंबई : मध्य रेल्वेच्या मेन लाईन आणि हार्बर मार्गांवर आज सकाळी 11 ते

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 29.04.2017
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 29.04.2017

सांगलीत गारा, तर वाशिममध्येही पावसाच्या सरी, स्कायमेटकडून पश्चिम

राज्यातील ऑटो-टॅक्सीचं भाडे सूत्र ठरवण्यासाठी ऑनलाईन सर्व्हेची मदत
राज्यातील ऑटो-टॅक्सीचं भाडे सूत्र ठरवण्यासाठी ऑनलाईन सर्व्हेची...

मुंबई : ऑन लाईन रेडिओ टॅक्सींना इतर टॅक्सी संघटनांचा वाढता विरोध

पैसे देण्याच्या बहाण्याने दोन ‘बेस्ट’ चालकांचा महिलेवर सामूहिक बलात्कार
पैसे देण्याच्या बहाण्याने दोन ‘बेस्ट’ चालकांचा महिलेवर सामूहिक...

कल्याण : पतीच्या मित्रांनीच पैसे देण्याच्या बहाण्यानं महिलेला घरी

अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सिद्धीविनायक मंदिरात अडीच किलो सोन्याचा लिलाव
अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सिद्धीविनायक मंदिरात अडीच किलो...

मुंबई : अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर दादरच्या सिद्धिविनायक

डॉक्टर यादवला माजी पोलीस अधिकाऱ्याची मदत, गुन्हे अन्वेषणची माहिती
डॉक्टर यादवला माजी पोलीस अधिकाऱ्याची मदत, गुन्हे अन्वेषणची माहिती

वसई : वसईतील खंडणीखोर डॉक्टर अनिल यादव प्रकरणात मोठा खुलासा झाला

महिला अधिकाऱ्याशी गैरवर्तनाचा आरोप, माजी आमदारावर गुन्हा दाखल
महिला अधिकाऱ्याशी गैरवर्तनाचा आरोप, माजी आमदारावर गुन्हा दाखल

पालघर : पालघरमध्ये माजी आमदार विवेक पंडित आणि जिल्हा परिषदेच्या