वर्सोवा बीचच्या सफाई बिग बींकडून जेसीबी-ट्रॅक्टर गिफ्ट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाचे स्वच्छतादूत असलेल्या अमिताभ बच्चन यांनी वर्सोवा बीचच्या स्वच्छतेसाठी हातभार लावला आहे.

वर्सोवा बीचच्या सफाई बिग बींकडून जेसीबी-ट्रॅक्टर गिफ्ट

मुंबई : वर्सोवा बीचवरील अस्वच्छतेमुळे सर्वसामान्यांपासून सेलिब्रेटींपर्यंत अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. या बीचच्या सफाईसाठी पुढाकार घेणारे पर्यावरणप्रेमी अफरोज शाह यांना खुद्द अमिताभ बच्चन यांनी मदतीचा हात दिला आहे. बिग बींनी खोदकामासाठी एक्सकॅवेटर (जेसीबी) आणि ट्रॅक्टर भेट दिला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाचे स्वच्छतादूत असलेल्या अमिताभ बच्चन यांनी वर्सोवा बीचच्या स्वच्छतेसाठी हातभार लावला आहे. ट्विटरवर फोटो शेअर करुन बिग बींनी ही माहिती दिली आहे.

Amitabh Bacchan tractor excavator 2

'एखाद्या सत्कार्यासाठी हातभार लावण्याचा आनंद वेगळाच असतो. मी आज केलेलं काम हा आयुष्यातील सर्वात समाधानकारक अनुभव होता. वर्सोवा समुद्र किनाऱ्याच्या स्वच्छतेसाठी एक्सकॅवेटर आणि ट्रॅक्टर भेट दिला.' असं ट्वीट अमिताभ बच्चन यांनी केलं आहे.अफरोज शाह यांनीही बिग बींनी गिफ्ट दिलेल्या जेसीबी आणि ट्रॅक्टरचे फोटो शेअर केले आहेत. पर्यावरणविरोधी लढ्यात तुम्ही आशेचा किरण आहात, अशा शब्दात शाहांनी बच्चन यांचे आभार मानले.

यापूर्वी अनुष्का शर्मा, रणदीप हुडा, दिया मिर्झा यासारख्या सेलिब्रेटींनीही वर्सोबा बीचच्या स्वच्छतेसाठी आवाज उठवला आहे.

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Amitabh Bachchan Gifts Tractor and JCB Excavator for Cleaning Versova Beach in Mumbai
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV