अमोल यादवांच्या विमानाचं नाव व्हीटी-नरेंद्र मोदी देवेंद्र'!

मात्र या नामकरणावरुन सोशल मीडियात चर्चा सुरु झाल्या आहेत.

अमोल यादवांच्या विमानाचं नाव व्हीटी-नरेंद्र मोदी देवेंद्र'!

मुंबई : अमोल यादव घराच्या गच्चीवर बनवलेल्या सहा आसनी स्वदेशी बनावटच्या विमानाचं नाव अखेर निश्चित झालं आहे. अमोल यादव यांनी आपल्या विमानाला VT-NMD हे नाव दिलं आहे. ह्या नावातील NMD चा अर्थ 'नरेंद्र मोदी देवेंद्र' असा आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष प्रयत्नामुळे विमानाचं स्वप्न पूर्णत्वास आल्यामुळे आपण त्यांचं नाव दिल्याची प्रतिक्रिया अमोल यादव यांनी एबीपी माझाकडे व्यक्त केली.  मात्र या नामकरणावरुन सोशल मीडियात चर्चा सुरु झाल्या आहेत.

अमोल यादवांच्या सहाआसनी स्वदेशी विमानाचं अखेर रजिस्ट्रेशन

...म्हणून विमानाला पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांचं नाव
"भारतातील विमानं VT ने रजिस्टर होतात. त्यानंतरची तीन अक्षरं आवडीनुसार ठेवण्याची मुभा असते. 2011 मी नोंदणीसाठी अर्ज केला होता. परंतु नोंदणीच्या कामात दिरंगाई, ढिसाळपणा दिसला. यामुळे देशाचं बरंच नुकसान झालं होतं. हे विमान 2016मध्ये मेक इन इंडियामध्ये सादर केलं होतं. मुख्यमंत्री आणि पंतप्रधांनी यांनी या प्रकल्पाला पाठिंबा दिला, सहकार्य केलं. त्यांच्यामुळे देशाचं मोठं नुकसान टळलं. त्यामुळे विमानाच्या नावातील NMD हे नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचं कॉम्बिनेशन आहे," असं अमोल यादव यांनी सांगितलं.

'मेक इन इंडिया' अंतर्गत तयार केलेल्या अमोल यादव त्यांच्या सहाआसनी विमानाची परवानगी तांत्रिक कारणामुळे रखडली होती. अखेर 17 नोव्हेंबरला डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हील एव्हिएशन विभागाने अमोल यादव यांच्या विमानाचं रजिस्ट्रेशन करुन घेतलं.

माझा कट्टा : विमान बनवणारा 'भीमा'चा बेटा
गच्चीवर विमानाची निर्मिती
कॅप्टन अमोल यांनी आपल्या चारकोप येथील इमारतीच्या गच्चीवर या विमानाची निर्मिती केली आहे. तर वांद्रे इथल्या ‘मेक इन इंडिया’ प्रदर्शनात या विमानाचं दर्शन घडवलं होतं. तसंच भारतात बनवलेलं हे पहिलं कमर्शियल एअरक्राफ्ट आहे. पुढच्या काही दिवसात ते आकाशात झेपावणार आहे.

अमोल यादवांच्या पहिल्या स्वदेशी विमानाला लालफितीचा ब्रेक


पीएमओकडून कानउघाडणी
विमानाच्या नोंदणीसाठी होणाऱ्या दिरंगाईवर विमान प्राधिकरणाची थेट पंतप्रधान कार्यालयाकडून कानउघाडणी झाली होती. मुंबईतील चारकोपमधल्या घराच्या छतावर अहोरात्र मेहनत करुन अमोल यादव यांनी तयार केलेलं विमान केवळ डीजीसीएची नोंदणी होत नसल्यानं उड्रडाणापासून रखडलं होतं. अखेर यादव यांच्या विमानाची नोंदणी पूर्ण झाली.

2011 पासून नोंदणीसाठी धडपड
2011 म्हणजे गेल्या सहा वर्षांपासून अमोल यादव या विमानाच्या नोंदणीसाठी धडपडत आहेत. विशेष म्हणजे अमोल यादव यांचं हे विमान मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या ‘मेक इन इंडिया वीक’मध्ये दिमाखात दाखवण्यात आलेलं होतं. त्यांच्या या प्रयत्नांचं कौतुक करत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधानांपर्यंतही हा विषय पोहचवला होता.

अमोल यादवांच्या सहा आसनी विमानाची नोंदणी प्रक्रिया सुरु


महाराष्ट्र सरकारनं या धडपडीचं कौतुक करत अमोल यांना 19 आसनी विमान बनवण्यासाठी जमीन आणि निधी देण्याचाही प्रस्ताव दिलेला आहे. अमोल यांनी 19 आसनी विमानाचा प्रोटोटाईप पूर्णही करत आणला आहे. पण त्याआधी 6 आसनी विमानाचं यशस्वी उड्डाण करुन दाखवणं त्यांना आवश्यक आहे. जेणेकरुन महाराष्ट्र सरकारसोबतचा त्यांचा मदतीचा करार पूर्णत्वास जाईल.

ज्या प्रक्रियेसाठी भारतात 6 वर्षे गेली, ती अमेरिकेत एका महिन्याच्या आतही पूर्ण होऊ शकली असती. पण नोंदणी अमेरिकेत झाल्यास ते विमान स्वदेशी राहणार नाही, या भावनेतून अमोल यादव थांबले होते.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Amol Yadav names aircraft after PM Modi and CM Fadnavis
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV