अंगणवाडी कर्मचारी बेमुदत संपावर

महिला आणि बालविकास विभागाने जाहीर केलेला अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठीचा मानधनवाढीचा प्रस्ताव वर्षभर रखडल्यानं हा संप पुकारण्यात आला आहे.

By: | Last Updated: 11 Sep 2017 01:16 PM
अंगणवाडी कर्मचारी बेमुदत संपावर

मुंबई: राज्यातील 2 लाख 7 हजार अंगणवाडी कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीनं याबाबतची अधिकृत घोषणा केली आहे.

महिला आणि बालविकास विभागाने जाहीर केलेला अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठीचा मानधनवाढीचा प्रस्ताव वर्षभर रखडल्यानं हा संप पुकारण्यात आला आहे.

जोपर्यंत सरकार ठोस कृती करत नाही तोपर्यंत हा संप सुरू राहील अशी भूमिका अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. त्यामुळे राज्यभरातील दोन लाखांहून अधिक अंगणवाडय़ा सोमवारपासून बंद असणार आहेत.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV