'कमला मिल आगीची सीबीआय चौकशी करा'

प्रतिक ठाकूर आणि इतर सहा याचिकाकर्ते हे २८ डिसेंबरला रात्री वन अबव्ह या ठिकाणी गेले होते. त्या रात्री लागलेल्या आगीत या सर्वांना दुखापत झाली होती.

'कमला मिल आगीची सीबीआय चौकशी करा'

मुंबई: कमला मिल आग प्रकरणात आता आणखी एक याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. प्रतिक ठाकूर यांच्यासह सहा जणांनी ही याचिका दाखल केली आहे.

प्रतिक ठाकूर आणि इतर सहा याचिकाकर्ते हे २८ डिसेंबरला रात्री वन अबव्ह या ठिकाणी गेले होते. त्या रात्री लागलेल्या आगीत या सर्वांना दुखापत झाली होती.

कमला मिल अग्नितांडवप्रकरणी आणखी एकाला अटक

कमला मिल प्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशी करण्यात यावी अशी मुख्य मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. राज्य सरकारनं मोजोस ब्रिस्टो पबचे मालक आणि व्यवस्थापक, मुंबई मनपाचे संबंधित अधिकारी आणि मुंबई अग्निशमन दलाचे या प्रकरणातील जबाबदार अधिकारी यांच्याविरोधात भारतीय दंडविधान 304 तसंच इतर लागू असलेल्या कलमांअंतर्गत गुन्हे नोंदवावेत अशी मागणी या याचिकेत करण्यात आलीय.

तसेच याचिकाकर्त्यांना या आगीत जी दुखापत झाली त्याचा खर्च मुंबई मनपा, राज्य सरकार आणि या प्रकरणातील आरोपी यांच्याकडून दिला जावा अशी मागणीही याचिकेत करण्यात आली आहे.

या दुर्घटनेत जे मरण पावले किंवा जखमी झाले असतील त्यांना प्रतिवाद्यांकडून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणीही याचिकेत करण्यात आली आहे. तसंच वन अबव्ह आणि मोजोस ब्रिस्टो यांच्या मालकांचे पासपोर्ट जप्त करण्यात यावेत अशीही मागणी याचिकेत करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या

कमला मिल अग्नितांडवप्रकरणी आणखी एकाला अटक

विशाल कारिया, बाळा खोपडे कमला मिल अग्नितांडवाचे मास्टरमाइंड?

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Another petition at HC on kamla mill fire
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV