अनुष्का शर्मा इटलीला रवाना, विरानुष्काच्या लग्नाच्या चर्चांना उधाण

इटलीमध्ये 13 ते 15 डिसेंबर असे तीन दिवस विराट-अनुष्काचा लग्नसोहळा असेल. 13 डिसेंबरला संगीत, 14 डिसेंबरला हळद आणि 15 डिसेंबरला लग्नाचा मुख्य सोहळा असेल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

अनुष्का शर्मा इटलीला रवाना, विरानुष्काच्या लग्नाच्या चर्चांना उधाण

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं आहे. त्यातच आता अनुष्का शर्मा कुटुंबीयांसोबत मुंबई विमानतळावर दिसली. अनुष्का इटलीला जात असल्याची चर्चा आहे.

अनुष्का शर्मा तिच्या आई, बाबा आणि भावासोबत शुक्रवारी रात्री मुंबई विमानतळावर दिसली. सूत्रांच्या माहितीनुसार अनुष्का इटलीला जात असून, तिथे विराटसोबत तिचं लग्न होणार आहे.

इटली नाही मुंबईतच विराट-अनुष्काचं लग्न, वांद्रे कोर्टातून फॉर्म नेला

महत्त्वाचं म्हणजे मुंबई विमानतळावर फक्त अनुष्का आणि तिचे कुटुंबीयच दिसले. परंतु विराट त्यांच्यासोबत नव्हता.

इटलीमध्ये 13 ते 15 डिसेंबर असे तीन दिवस विराट-अनुष्काचा लग्नसोहळा असेल. 13 डिसेंबरला संगीत, 14 डिसेंबरला हळद आणि 15 डिसेंबरला लग्नाचा मुख्य सोहळा असेल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान, लग्नासाठी अनुष्का आणि विराट थेट इटलीला जाणार नाही. अनुष्काने शुक्रवारी रात्री मुंबईहून दुबईला उड्डाण केलं आहे. दुबईमध्ये लग्नाची खरेदी केल्यानंतर पुढील टप्पा सिंगापूर असेल. सिंगापूरमध्ये एक दिवस थांबल्यानंतर दोघे लंडनला जाणार आहे. तिथून 12 डिसेंबरला ते इटलीला पोहोचतील.

विराट-अनुष्का लग्नाच्या बातम्या फक्त अफवा, अनुष्काच्या प्रवक्त्यांची माहिती

दुसरीकडे 'विरानुष्का' इटलीमध्ये नाही, तर भारतात, तेही मुंबईतच विवाहबंधनात अडकण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. वांद्र्या्च्या फॅमिली कोर्टात जाऊन अनुष्काने स्वतः लग्नाच्या नोंदणीसाठी लागणारा फॉर्म आणल्याची माहिती आहे. पीपींगमून.कॉम या वेब पोर्टलने याबाबत रिपोर्ट दिला आहे. त्यामुळे विराट-अनुष्काचं विवाहस्थळ आणि तारीख याबाबत चर्चांना उधाण आलं आहे.

संबंधित बातम्या :

येत्या शनिवारी विराट-अनुष्काचं लग्न?

विराटचा लग्नासाठी ब्रेक, डिसेंबरमध्ये अनुष्कासोबत लग्न?

‘मी नेहमी तुझी काळजी घेईन…’, विराटचं अनुष्काला वचन

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Anushka Sharma left for Italy from Mumbai airport
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV