राज ठाकरे-आशिष शेलारांमध्ये ‘कृष्णकुंज’वर गुफ्तगू

राज ठाकरे आणि आशिष शेलार यांच्यात नेमकी काय चर्चा झाली, याबाबतचा तपशील समोर आलेला नाही. किंबहुना, मनसे किंवा भाजपच्या कोणत्याही नेत्याने यासंदर्भात माहिती दिली नाही.

राज ठाकरे-आशिष शेलारांमध्ये ‘कृष्णकुंज’वर गुफ्तगू

मुंबई : मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. शेलार आज सकाळीच राज ठाकरेंचे निवासस्थान असलेल्या ‘कृष्णकुंज’वर गेले होते.

राज ठाकरे आणि आशिष शेलार यांच्यात नेमकी काय चर्चा झाली, याबाबतचा तपशील समोर आलेला नाही. किंबहुना, मनसे किंवा भाजपच्या कोणत्याही नेत्याने यासंदर्भात माहिती दिली नाही.

राज ठाकरे आणि आशिष शेलार यांच्यात इतक्या गुप्तपणे झालेल्या या भेटीमागे नक्की काय कारण होते, याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. राज ठाकरे हे मनसेचे पक्षप्रमुख, तर आशिष शेलार हे मुंबई भाजपचे अध्यक्ष आहेत, त्यामुळे राजकारणातील दोन महत्त्वाच्या पदांवरील या नेत्यांच्या भेटीला नक्कीच मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Ashish Shelaar meets Raj Thackeray latest updates
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV