एटीएम फोडताना पोलिस आले, चोरटे रंगेहाथ पकडले!

नालासोपाऱ्यात दोन तरुणांचा एटीएम लुटीचा प्रयत्न फसला आहे. गस्तीवर असलेल्या पोलिसांना संशय आल्यानं दोघांनाही रंगेहाथ पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे. आज रविवारी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला आहे.

एटीएम फोडताना पोलिस आले, चोरटे रंगेहाथ पकडले!

वसई : नालासोपाऱ्यात दोन तरुणांचा एटीएम लुटीचा प्रयत्न फसला आहे. गस्तीवर असलेल्या पोलिसांना संशय आल्यानं दोघांनाही रंगेहाथ पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे. आज रविवारी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला आहे.

नालासोपारा पूर्वेकडील संतोष भुवनजवळील शर्मावाडी येथे टाटा इंडीकॅश हे एटीएम मशिन आहे. आज रविवारी पहाटे तीनच्या सुमारास दोन व्यक्तींनी तोडांवर रुमाल बांधून एटीएममध्ये प्रवेश केला आणि एटीएम मशीन लोखंडी हत्यारांच्या साहाय्याने फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र पेट्रोलिंगला असलेल्या पोलिसांनी एटीएममध्ये संशयास्पद हालचाली पाहून एटीएममध्ये प्रवेश केला.

घटनास्थळावरुन पोलिसांनी एकाला अटक केली, मात्र दुसरा पळून जाण्यात यशस्वी झाला. मात्र त्याचाही पाठलाग करुन पोलिसांनी त्याला जेरबंद केलं. या दोघांचीही कसून चौकशी सुरु आहे. तसंच त्यांच्यामागे लूट करणारी आणखी टोळी आहे का याचाही पोलीस तपास करत आहेत.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: atm rabbery failed as cops entered on time latest marathi news updates
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV