मुंबई विमानतळावर 'आयसिस'शी संबंधित संशयिताला अटक

आयसिस या दहशतवादी संघटनेशी संबंधित असणाऱ्या एका संशयिताला अटक करण्यात आली आहे. मुंबई विमानतळावरुन शनिवारी रात्री ही कारवाई करण्यात आली. उत्तर प्रदेश एटीएसनं ही कारवाई केली आहे.

मुंबई विमानतळावर 'आयसिस'शी संबंधित संशयिताला अटक

मुंबई : आयसिस या दहशतवादी संघटनेशी संबंधित असणाऱ्या एका संशयिताला अटक करण्यात आली आहे. मुंबई विमानतळावरुन शनिवारी रात्री ही कारवाई करण्यात आली. उत्तर प्रदेश एटीएसनं ही कारवाई केली आहे.

एटीएसच्या या कारवाईमुळे मुंबईत मोठ्या घातपाताच्या तयारीला ब्रेक मिळाल्याचा दावा पोलिसांकडून केला जात आहे. अबु जाहिद सलाउद्दीन शेख असं या संशय़ित आरोपीचं नाव आहे. तो मूळचा उत्तर प्रदेशातल्या आझमगड इथला राहणार आहे.

सध्या उत्तर प्रदेश पोलिसांनी या आरोपीला ताब्यात घेतलं आहे. आता त्याची कसून चौकशी केली जाणार आहे. चौकशीअंती या कारवाईचा तपशील समोर येईल.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: ats arrested isis suspect on mumbai airport latest marathi news updates
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV