स्वप्निल सोनावणे हत्याप्रकरण : वकील अमित कटारनवरेंवर प्राणघातक हल्ला

नवी मुंबईतील वकील अमित कटारनवरे यांच्यावर धारदार शस्त्रांनी प्राणघातक हल्ला कऱण्यात आला आहे. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांना नेरुळच्या डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

स्वप्निल सोनावणे हत्याप्रकरण : वकील अमित कटारनवरेंवर प्राणघातक हल्ला

नवी मुंबई : नवी मुंबईतील वकील अमित कटारनवरे यांच्यावर धारदार शस्त्रांनी प्राणघातक हल्ला कऱण्यात आला आहे. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांना नेरुळच्या डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

अमित कटारनवरे हे नेरुळमधील स्वप्निल सोनावणे हत्याकांड प्रकरणातील प्रमुख वकील आहेत. स्वप्निलच्या बाजूने ते केस लढत होते. आज रविवारी त्यांच्यावर नवी मुंबईत त्यांच्यावर धारदार शस्त्रानं हल्ला करण्यात आला. डोक्यात, पोटात आणि पायावर वार झाल्यानं ते गंभीर जखमी झाले आहेत. अमित कटारनवरे यांच्यावर यापूर्वीही हल्ल्याचा प्रयत्न झाला होता.

नवी मुंबईत प्रेमप्रकरणातून 15 वर्षीय अल्पवयीन मुलाची जुलै 2016 मध्ये हत्या करण्यात आली होती. स्वप्निल सोनावणे असं मृत मुलाचं नाव होतं. नेरुळच्या सेक्टर 13 मध्ये ही घटना घडली होती.

काय आहे स्वप्निल सोनावणे हत्याप्रकरण?

नवी मुंबईत प्रेमप्रकरणातून स्वप्निल सोनावणे या 15 वर्षीय अल्पवयीन मुलाची हत्या करण्यात आली होती. नेरुळच्या सेक्टर 13 मध्ये ही घटना घडली होती.

मुलगा आणि मुलगी पहिलीपासून एकाच वर्गात होते. त्यामुळे दोघांची मैत्री होती. मात्र मुलीच्या घरच्यांना ही मैत्री मान्य नसल्याने कुटुंबीयांनी स्वप्निलला घरी बोलवून घेतलं आणि जबर मारहाण केली.

यानंतर उपचारासाठी स्वप्निलला डी.वाय.पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

याप्रकरणी नेरुळ पोलिसांनी अल्पवयीन मुलीला अटक करुन तिची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली होती. तसंच सागर नाईक (भाऊ, वय 25 वर्ष), राजेंद्र नाईक (वडील, वय 50 वर्ष), साजेश नाईक (भाऊ, वय 22 वर्ष), दुर्गेश पाटील (मित्र, वय 22 वर्ष), आशिष ठाकूर (मित्र, वय 23 वर्ष) या पाच आरोपींना अटक केली होती.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: attack on amit katarnavare in new mumbai latest marathi news updates
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV