मुंबईत एकतर्फी प्रेमातून विवाहितेवर चाकूहल्ला

एकतर्फी प्रेमातून हा हल्ला झाला असून या मुलीच्या अश्लील क्लिप काढून तिला हा तरुण ब्लॅकमेल करत होता, असा आरोप करण्यात आला आहे.

मुंबईत एकतर्फी प्रेमातून विवाहितेवर चाकूहल्ला

मुंबई : राजधानी मुंबईत महिला अत्याचाराच्या एकाच दिवसात दोन घटना घडल्या आहेत. कुर्ल्यातील नेहरुनगरमध्ये अल्पवयीन मुलीला बेदम मारहाण केल्याची घटना ताजी आहे. त्यातच विक्रोळीत ऑफिसमध्ये घुसून एका विवाहित महिलेवर तरुणाने चाकूहल्ला केल्याची घटना घडली आहे.

सावीर हसन मोहम्मद खान असं या तरुणाचे नाव आहे. तो वाकोला येथे राहतो. एकतर्फी प्रेमातून हा हल्ला झाला असून या मुलीच्या अश्लील क्लिप काढून तिला हा तरुण ब्लॅकमेल करत होता, असा आरोप करण्यात आला आहे.

साबीर हा आज दुपारी या महिलेच्या ऑफिसमध्ये गेला. तिथे त्याला तिने ऑफिसच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न केला असता त्याने तिच्यावर चाकूने हल्ला केला. यात महिला गंभीर जखमी झाली असून चेहऱ्यावर आणि हातावर 33 टाके पडले आहेत.

सध्या महिलेचा जबाब नोंदविण्याचे प्रक्रिया सुरू असून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं आहे. मात्र मुंबईत एकाच दिवसात महिला अत्याचाराच्या दोन घटना घडल्याने महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

कुर्ल्यातील नेहरु नगरमध्ये अल्पवयीन मुलीला मारहाण

कुर्ल्यातील अल्पवयीन मुलीला मारहाण करुन बेशुद्ध करणाऱ्या आरोपीला अखेर पोलिसांनी पुन्हा अटक केली आहे. 17 तारखेला कुर्ल्यातील नेहरूनगरमध्ये घडलेल्या घटनेनंतर पोलिसांनी आरोपी इम्रान शेखवर किरकोळ गुन्हा दाखल करुन त्याची सुटका केली होती.

मात्र, या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज हाती लागल्यानंतर एबीपी माझानं पोलिसांच्या भूमिकेवरती थेट सवाल उपस्थित केले. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत इम्रान शेखला अटक केली. त्याच्याविरोधात पोस्को कायद्यातंर्गत गुन्हा दाखल होणार आहे.

कुर्ल्यातील नेहरुनगरमध्ये  17 ऑक्टोबरला पीडित अल्पवयीन मुलगी ट्यूशनला जात होती. तेव्हा रस्त्यात काही टवाळखोर मुलांनी तिची छेडछाड काढायला सुरुवात केली. त्याला मुलीनं विरोध केला आणि ती घरी जाण्यास निघाली. यानंतर रिक्षातून एक मुलगा उतरला आणि त्यानं या मुलीला जोरदार मारहाण केली. ही सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली आहे.

संबंधित बातमी :  मुंबईत छेडछाडीला विरोध केल्याने तरुणीला मारहाण, आरोपी अटकेत


 

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV