VIDEO : तुर्भे स्थानकावर तरुणीला जबरदस्ती मिठी मारण्याचा प्रयत्न

नवी मुंबईच्या तुर्भे रेल्वे स्थानकात काल (गुरुवार) ४३ वर्षीय इसमानं एका मुलीला जबरदस्तीने मिठी मारण्याचा प्रयत्न केला. नरेश जोशी असं या आरोपीचं नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

VIDEO : तुर्भे स्थानकावर तरुणीला जबरदस्ती मिठी मारण्याचा प्रयत्न

नवी मुंबई : नवी मुंबईच्या तुर्भे रेल्वे स्थानकात काल (गुरुवार) ४३ वर्षीय इसमानं एका मुलीला जबरदस्तीने मिठी मारण्याचा प्रयत्न केला. प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर ही घटना घडली.

नरेश जोशी असं या आरोपीचं नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. नरेश हा नवी मुंबईच्या घणसोली परिसरात राहतो.

काल सकाळी साडे अकराच्या दरम्यान एक तरुणी तुर्भे स्थानकात लोकलची वाट पाहत उभी होती. त्याचवेळी आरोपी नरेश जोशी याने मुलीसोबत बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या प्रकारानंतर आरपीएफ पोलिसांनी तात्काळ प्लॅटफॉर्मवर धाव घेत आरोपीला अटक केली.

याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी आरोपीला वाशी जीआरपीकडे सोपवलं असून त्याच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

VIDEO : 

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Attempt to hug the girl at the Turbhe station the accused arrested latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV