सिनेव्हिस्टा आग : ऑडिओ असिस्टंटचा होरपळून मृत्यू

कांजूरमार्गमधील गांधी नगर परिसरात पवई टेलिफोनसमोर हा सिने विस्टा नावाचा स्टुडिओ आहे.

सिनेव्हिस्टा आग : ऑडिओ असिस्टंटचा होरपळून मृत्यू

मुंबई : कांजूरमार्गमधील सिनेव्हिस्टा स्टुडिओच्या आगीत ऑडिओ असिस्टंटचा होरपळून मृत्यू झाला. गोपी वर्मा असे ऑडिओ असिस्टंटचे नाव आहे.

गोपी वर्मा यांचं शरीर पूर्णपणे जळालेल्या अवस्थेत आढळलं. गोपी वर्मांचा मृतदेह राजावाडी हॉस्पिटलला शवविच्छेदनासाठी नेण्यात येईल, त्यानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला जाईल.

काल संध्याकाळी या स्टुडिओला आग लागली होती. त्यावेळी अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत, आगीवर नियंत्रण मिळवलं होतं.

कांजूरमार्गमधील गांधी नगर परिसरात पवई टेलिफोनसमोर हा सिनेव्हिस्टा नावाचा स्टुडिओ आहे. या स्टुडिओत प्रामुख्याने हिंदी मालिकांचे शूटिंग चालतं. तसंच जुन्या थीमचा सेटही या स्टुडिओत उभारण्यात आला होता.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Audio Assistant killed in Cinevista massive fire in Kanjurmarg
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV