डोंबिवलीत रिक्षाचालकाची मुजोरी, महिला होमगार्डला नाल्यात फेकलं

डोंबिवलीत रिक्षाचालकाची मुजोरी, महिला होमगार्डला नाल्यात फेकलं

डोंबिवली : मुंबई उपनगरात रिक्षाचालकांची मुजोरी थांबण्याचं नाव घेत नाही आहे. काही महिन्यांपूर्वी भिवंडीत एका एसटी चालकाला मारहाणीची घटना समोर आल्यानंतर, वाहतूक शाखेनं धडक कारवाई सुरु केली होती. पण तरीही रिक्षाचालकांची मुजोरी अजूनही कायम आहे. आता तर थेट मुजोर रिक्षाचालकांनं महिली होमगार्डला नाल्यात फेकलं आहे.

रविवारी सकाळी डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेला रवी गुप्ता नावाच्या रिक्षा चालकाने नोपार्किंगमध्ये आपली रिक्षा पार्क करण्याचा प्रयत्न केला. यावेळी तिथे वाहतूक नियंत्रित करत असलेल्या महिला होमगार्डने गुप्ताला रिक्षा पार्क करण्यास मज्जाव केला. यावेळी या दोघांमध्येही शाब्दिक वाद झाला. यानंतर महिला होमगार्डने स्वत: रिक्षात बसून रिक्षा रामनगर पोलीस ठाण्यात नेण्यास सांगितले.

पण रिक्षाचालकाने आपली रिक्षा पोलीस ठाण्यात नेण्याऐवजी ठाकुर्लीच्या दिशेने दामटवली. पुढे जाऊन त्याने त्या महिला होमगार्डला मारहाण करुन धक्का देऊन नाल्यात फेकले, आणि तिथून पळ काढला. यावेळी त्या होमगार्डला दुखापत झाली असून,  याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून, पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.

दरम्यान, रिक्षाचालकांची मुजोरी दिवसेंदिवस वाढत आहे. काही महिन्यांपूर्वी भिवंडीमध्ये एसटी चालकाला झालेल्या मारहाणीत एसटी चालकाचा जागीच मृत्यू झाला होता. यानंतर मुजोर रिक्षाचालकांविरोधात आरटीओने धडक कारवाई सुरु केली होती.

तर दुसरीकडं नाशिकमध्ये रिक्षा चालकांविरोधातील वाढत्या तक्रारी लक्षात घेऊन, वाहतूक शाखेनं दोन दिवसात 300 बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाई केली. यावेळी त्यांच्याकडून दंड देखील वसूल करण्यात आला होता. पण तरीही रिक्षा चालकांची मुजोरी जैसे थेच आहे.

First Published: Sunday, 19 March 2017 5:26 PM

Related Stories

कल्याण-डोंबिवली महापालिकेत नगरसेवकांचे समर्थक भिडले
कल्याण-डोंबिवली महापालिकेत नगरसेवकांचे समर्थक भिडले

  कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या दोन नगरसेवकांच्या

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 25/03/2017
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 25/03/2017

फडणवीस सरकारचं एक पाऊल मागे, आमदारांचं निलंबन मागे घेणार, 29 मार्चला 12

नवी मुंबई पालिका आयुक्त तुकाराम मुंढे पुणे PMPML चे अध्यक्ष
नवी मुंबई पालिका आयुक्त तुकाराम मुंढे पुणे PMPML चे अध्यक्ष

मुंबई : नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची पुणे

दोन टप्प्यात 19 आमदारांचं निलंबन मागे घेणार : सूत्र
दोन टप्प्यात 19 आमदारांचं निलंबन मागे घेणार : सूत्र

मुंबई : विधानसभेतील विरोधी पक्षाच्या 19 आमदारांचं निलंबन रद्द

अखेर मुंबईत AC लोकल धावली !
अखेर मुंबईत AC लोकल धावली !

मुंबई: मुंबईकरांचा गारेगार प्रवास आता नजरेच्या टप्प्यात आहे. कारण

शिवस्मारक जगात सर्वात उंच, 210 मीटरपर्यंत उंची वाढवण्याचा प्रस्ताव
शिवस्मारक जगात सर्वात उंच, 210 मीटरपर्यंत उंची वाढवण्याचा प्रस्ताव

मुंबई : मुंबईतील समुद्रात होणारं शिवस्मारक जगातील सर्वाधिक उंचीचा

मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प 29 मार्चला !
मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प 29 मार्चला !

मुंबई: आशिया खंडातील सर्वात मोठी महानगरपालिका असलेल्या मुंबई

उद्धव ठाकरेंना मोदींकडून स्नेहभोजनाचं निमंत्रण
उद्धव ठाकरेंना मोदींकडून स्नेहभोजनाचं निमंत्रण

नवी दिल्ली : शिवसेना सातत्याने करत असलेला विरोध टाळण्यासाठी आता

गायब खा. रवी गायकवाड यांचा पत्ता लागला!
गायब खा. रवी गायकवाड यांचा पत्ता लागला!

मुंबई : ऑगस्ट क्रांती राजधानी एक्स्प्रेसनने निघालेले शिवसेनेचे

इंदू मिलचं आज राज्य सरकारकडे हस्तांतरण
इंदू मिलचं आज राज्य सरकारकडे हस्तांतरण

मुंबई : मुंबईतील इंदू मिलच्या जागेचं आज राज्य सरकारकडे हस्तांतरण