जेट एअरवेजच्या विमानात बाळाचा जन्म, आयुष्यभर मोफत प्रवास

By: | Last Updated: > Sunday, 18 June 2017 11:50 PM
जेट एअरवेजच्या विमानात बाळाचा जन्म, आयुष्यभर मोफत प्रवास

मुंबई : जेट एअरवेजच्या विमानात एका प्रवासी महिलेनं मुलाला जन्म दिला आहे. सौदी अरेबियातील दमामहून कोचीला जाणाऱ्या विमानात बाळाचा जन्म झाला. जेट एअरवेजने बाळाला आजन्म मोफत विमान प्रवास देण्याची घोषणा केली आहे.

पहाटे 2.55 वाजताच्या सुमारास एका गर्भवतीला प्रीमॅच्युर प्रसुतीकळा येऊ लागल्या. त्यावेळी विमान अरबी समुद्रावर 35 हजार फुटांवरुन प्रवास करत होतं. विमानातल्या कर्मचाऱ्यांनी तातडीनं विमान जवळ असलेल्या मुंबई विमानतळाकडे वळवलं.

महिलेला प्रसुतीकळा सुरु होताच कर्मचाऱ्यांची एकच धावपळ उडाली. दमाम-कोची 9W 569 या विमानात 162 प्रवासी होते, मात्र डॉक्टर नव्हता. त्यामुळे विमानातून प्रवास करणाऱ्या केरळमधील एका नर्स आणि इतर महिलांच्या मदतीनं या महिलेची प्रसुती पार पडली.

या महिलेनं विमानातच गोंडस बाळाला जन्म दिला. मुंबई विमानतळावरुन उतरताच बाळ-बाळंतीणीला रुग्णालयात रवाना करण्यात आलं. आई आणि बाळाची प्रकृती उत्तम असल्याचं जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं.

जेट एअरवेजच्या विमानात जन्माला आलेलं पहिलंच बाळ असल्यामुळे कंपनीने त्याला जेट एअरवेजच्या कोणत्याही विमानाने आजन्म मोफत प्रवास करु देण्याची घोषणा केली आहे.

First Published:

Related Stories

राज्यातील शेतकरी आंदोलनात नितीश कुमारही सहभागी होणार!
राज्यातील शेतकरी आंदोलनात नितीश कुमारही सहभागी होणार!

पाटणा : राज्यात सप्टेंबरमध्ये होणाऱ्या शेतकरी आंदोलनात बिहारचे

SBI अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्यांचा पगार किती?
SBI अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्यांचा पगार किती?

नवी दिल्ली : जगातील सर्वात मोठ्या 50 बँकांच्या यादीत समावेश असलेल्या

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 26/06/2017
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 26/06/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 26/06/2017 1. मान्सूनच्या प्रगतीतले अडथळे

दोन खोल्या, दोन बल्ब आणि पंखा, वीज बिल 75 कोटी!
दोन खोल्या, दोन बल्ब आणि पंखा, वीज बिल 75 कोटी!

रायपूर (छत्तीसगड): दोन खोल्यांचं घर त्यामध्ये दोन बल्ब आणि दोन पंखे

हाफिज सईदच्या मेहुण्याची दहशतवाद्यांसाठी प्रार्थना
हाफिज सईदच्या मेहुण्याची दहशतवाद्यांसाठी प्रार्थना

लाहोर : श्रीनगरच्या पांथा चौकवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचं लाहोर

सुषमा स्वराज यांचा ट्विटरवरुन मीरा कुमार यांच्यावर निशाणा
सुषमा स्वराज यांचा ट्विटरवरुन मीरा कुमार यांच्यावर निशाणा

नवी दिल्ली : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसनं माजी

‘सर्जिकल स्ट्राईक’मुळे जगाला भारताचं सामर्थ्य दिसलं: पंतप्रधान मोदी
‘सर्जिकल स्ट्राईक’मुळे जगाला भारताचं सामर्थ्य दिसलं: पंतप्रधान...

व्हिर्जीनिया (अमेरिका) : ‘सर्जिकल स्ट्राईबद्दल एकाही देशाची

काश्मीरमध्ये पाकिस्तानचे झेंडे दाखवत जवानांवर दगडफेक
काश्मीरमध्ये पाकिस्तानचे झेंडे दाखवत जवानांवर दगडफेक

जम्मू-काश्मीर: सतत धुमसणारं जम्मू-काश्मीरचं खोरं

सुषमा स्वराज भारतीयांना रात्री 2 वाजताही मदत करतात: पंतप्रधान मोदी
सुषमा स्वराज भारतीयांना रात्री 2 वाजताही मदत करतात: पंतप्रधान मोदी

व्हर्जिनिया (अमेरिका): अमेरिकेत स्थायिक झालेल्या भारतीयांशी संवाद

VIDEO: मुजोर भाजप कार्यकर्त्यांना 'मर्दानी' पोलिसाचं प्रत्युत्तर
VIDEO: मुजोर भाजप कार्यकर्त्यांना 'मर्दानी' पोलिसाचं प्रत्युत्तर

लखनौ : भाजप कार्यकर्त्यांच्या मुजोरीला न जुमानता ड्युटी बजावणारी