मैत्रिणींचे न्यूड फोटो बॉयफ्रेण्डला पाठवले, युवतीची बॉयफ्रेण्डसह आत्महत्या

सुरेशच्या तगाद्यामुळे तिने आपल्या दोन रुममेट्सचे न्यूड फोटो त्याला पाठवले. मात्र तरुणीने चोरीछुपे काढलेल्या फोटोचं चॅट एका रुममेटने पाहिलं.

मैत्रिणींचे न्यूड फोटो बॉयफ्रेण्डला पाठवले, युवतीची बॉयफ्रेण्डसह आत्महत्या

मुंबई : बदलापूरमध्ये रेल्वेखाली आत्महत्या करणाऱ्या तरुण आणि तरुणीच्या आत्महत्येचं गूढ उलगडण्यात पोलिसांना यश आलं आहे. बॉयफ्रेण्डच्या तगाद्यामुळे मैत्रिणींचे अश्लील फोटो काढणाऱ्या युवतीला आपल्या कृत्याचा पश्चाताप झाल्यानंतर तक्रारीच्या भीतीने तिने बॉयफ्रेण्डसह आयुष्य संपवलं.

मूळ रत्नागिरीच्या असलेल्या तरुण आणि तरुणीने शनिवारी 23 सप्टेंबरला बदलापूरजवळ रेल्वेखाली आत्महत्या केली होती. त्यानंतर चार दिवसांनी या आत्महत्या प्रकरणाचं गूढ उकलण्यात पोलिसांना यश आलं आहे. 'टाइम्स ऑफ इंडिया'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.

संबंधित 21 वर्षीय तरुणी मुंबईतील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये नर्सिंगची विद्यार्थिनी होती. तर तिचा बॉयफ्रेण्ड सुरेश शिंदे एका प्रायव्हेट क्लिनिकमध्ये नोकरी करतो. सुरेशच्या तगाद्यामुळे तिने आपल्या दोन रुममेट्सचे न्यूड फोटो त्याला पाठवले. मात्र तरुणीने चोरीछुपे काढलेल्या फोटोचं चॅट एका रुममेटने पाहिलं.

21 सप्टेंबरला दोन्ही रुममेट्सनी तिला याविषयी झापलं. तेव्हा सुरेशच्या सांगण्यावरुन आपण फोटो काढल्याची कबुली तिने दिली. आपल्या रिलेशनशीपबद्दल घरी सांगण्याची धमकी देत सुरेशने फोटो काढायला लावल्याचंही तिने सांगितलं.

रत्नागिरीच्या तरुण-तरुणीची बदलापूरमध्ये रेल्वेखाली आत्महत्या


हे फोटो सुरेशने काढायला सांगितल्याचं लेखी दिलं आणि त्याच्याशी सर्व संबंध तोडले, तरच या प्रकरणाची तक्रार न करण्याची ग्वाही रुममेट्सनी दिली. त्यानुसार तरुणीने एका चिठ्ठीवर हा मजकूर लिहून खाली स्वाक्षरीही केली. मात्र दोनच दिवसात तरुणीला सुरेशसोबत चॅटिंग करताना दोघींनी पकडलं.

इतकं होऊनही बॉयफ्रेण्डसोबत बोलल्यामुळे तिघींमध्ये जोरदार भांडण झालं. या प्रकाराची पोलिसात तक्रार देण्याची धमकीही त्यांनी तरुणीला दिली. त्यामुळे घाबरलेली तरुणी काही पैसे घेऊन घराबाहेर पडली. आपल्या कृत्याचा पश्चाताप होतानाच तक्रारीची भीती तिला सतावत होती.

रात्रीचे 11 वाजून गेल्यानंतरही ती परत न आल्यामुळे हॉस्टेलच्या अधिकाऱ्यांनी पोलिसात ती बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. त्याचवेळी दोन्ही रुममेट्सनी घडलेला प्रकार सांगितला.

तरुणीने तोपर्यंत बॉयफ्रेण्ड सुरेशसोबत रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली होती. बदलापूरजवळ संध्याकाळी 6.30 वाजताच्या सुमारास त्यांचे मृतदेह आढळले, मात्र त्यांची ओळख त्यावेळी पटली नव्हती. दुसऱ्या दिवशी तरुणीने लिहिलेली सुसाईड नोट पोलिसांना सापडली.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV