हातावर सुसाईड नोट, बारामतीत युवकाची आत्महत्या

19 वर्षीय महेश मगुटने राहत्या घरी गळफास घेऊन आयुष्य संपवलं.

हातावर सुसाईड नोट, बारामतीत युवकाची आत्महत्या

बारामती : हातावर सुसाईड नोट लिहून महाविद्यालयीन विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना बारामतीत उघडकीस आली आहे. 19 वर्षीय महेश भानुदास मगुट (कोळी) ने आयुष्य संपवलं.

महेशने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. बॅंकेच्या कर्मचाऱ्यांमुळे आत्महत्या करत असल्याचं महेशने आत्महत्येपूर्वी हातावर लिहिलं होतं. 'माझ्या मरणासाठी जबाबदार बँक कर्मचारी यांच्यावर कारवाई करावी. आई, आबा, अक्का माफ करा' असं महेशने लिहिलं.

बारामती तालुक्यातल्या काटेवाडीमध्ये ही घटना घडली. बारामतीतील पोलिस ठाण्यात बॅंकेच्या कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Baramati Suicide Note on hand

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Baramati : Youth commits suicide, writes note on hand latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV