लिंगबदलानंतरही नोकरीत कायम ठेवा, महिला पोलिस कॉन्स्टेबल हायकोर्टात

दुसरीकडे, आता या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनीही हस्तक्षेप केला असून पोलिस महासंचालक तसंच गृहविभागाने याप्रकरणाकडे सहानुभूतीने पाहावं, असा सल्ला दिला आहे.

लिंगबदलानंतरही नोकरीत कायम ठेवा, महिला पोलिस कॉन्स्टेबल हायकोर्टात

मुंबई : लिंगबदलाच्या मागणीनंतर नोकरीवर गदा आल्यामुळे बीडची महिला कॉन्स्टेबल ललिता साळवेने मुंबई उच्च न्यायालयाचं दार ठोठावलं आहे. लिंगबदलाच्या शस्त्रक्रियेनंतरही आपल्याला पोलिस दलाने नोकरीत कायम ठेवावं, अशी मागणी ललिता साळवेने याचिकेत केली आहे. लवकरच या याचिकेवर सुनावणी होणं अपेक्षित आहे.

काय आहे प्रकरण?
बीड पोलिस अधीक्षक कार्यालयात काम करणाऱ्या ललिताने लिंग बदलण्यासाठी सुट्टी द्यावी असा अर्ज केला आहे. बीड पोलिस अधिक्षक कार्यालयासह महाराष्ट्र पोलिस दलच नाही तर राज्याचे गृहविभाग देखील यासंदर्भात पुढे काय करायचं याचा विचार करत आहे. या विषयावर पोलीसांकडून कोणीही बोलायला तयार नाहीत. मात्र ललिता साळवेने आपली मागणी लावून धरलीय की, ऑपरेशननंतरही पोलिस दलातील नोकरी कायम राहावी.

ललिताची 23 जुनला मुंबईतील जेजे हॉस्पिटलमध्ये हार्मोन आणि शारीरिक चाचणीसाठी भरती झाली. 2-3 तास चाचणी झाल्यानंतर जेजे हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी ललिता साळवेला लिंग बदलण्याचा निर्णय योग्य असल्याचं सांगितलं. त्यानंतर 17 सप्टेंबर 2017 रोजी ललिता साळवेने बीडच्या पोलिस अधीक्षकांना पत्र लिहून लिंग बदलासाठी सुट्टी पाहिजे, असा अर्ज केला आहे. त्याची प्रत पोलिस महासंचालक सतीश माथूर यांनाही मेलद्वारे पाठवण्यात आली आहे.

पण, या ललिता साळवेची महिला गटातून पोलिस दलात भरती झाली आहे. त्यामुळे लिंग बदलानंतर या महिलेला नोकरीला मुकावं लागेल, असं पोलिस अधीक्षक कार्यालयातून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे नोकरीवरील हक्क मागण्यासाठी न्यायालयात जाण्याशिवाय ललिता साळवेडे पर्याय उरला नाही.

दुसरीकडे, आता या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनीही हस्तक्षेप केला असून पोलिस महासंचालक तसंच गृहविभागाने याप्रकरणाकडे सहानुभूतीने पाहावं, असा सल्ला दिला आहे.

संबंधित बातम्या

‘त्या’ महिला कॉन्स्टेबलचा सहानुभूतीपूर्वक विचार करा : मुख्यमंत्री

बीडमधील महिला पोलिस कॉन्स्टेबलची लिंग बदलासाठी सुट्टी

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Beed lady constable files petition at Mumbai high court
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV