मुंबईत ओव्हलवर बेल्जियमच्या राजा-राणीचं क्रिकेट

राणी माथिल्डे यांनी घुमवलेली बॅट पाहून राजाही काही क्षण थक्क झाला.

मुंबईत ओव्हलवर बेल्जियमच्या राजा-राणीचं क्रिकेट

मुंबई : एरवी क्रिकेटपटूंनी गजबजलेलं ओव्हल मैदान आज अनोख्या क्षणांचं साक्षीदार ठरलं. चक्क बेल्जियमचा राजा फिलीप आणि राणी माथिल्डे यांनी मुंबईतील ओव्हल मैदानावर क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला.

44 वर्षीय माथिल्डे यांनी घुमवलेली बॅट पाहून राजाही काही क्षण थक्क झाला. त्यानंतर राणीने हातात चेंडू घेऊन बॉलिंगही केली. युनिसेफतर्फे लहान मुलांसाठी आयोजित क्रिकेट मॅचला राजा-राणी हजेरी लावली.

बेल्जियमचे राजा-राणी सात दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी जगप्रसिद्ध ताजमहाललाही भेट दिली.

विशेष म्हणजे क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने क्रिकेटमधील काही ट्रिक्सचा कानमंत्र राजा फिलिप यांना दिला. यानंतर वीरुही लहान मुलांमध्ये रमताना दिसला. छोट्या क्रिकेटवीरांना सेहवागने क्रिकटचे धडे दिले.

मुलांना खेळण्यासाठी प्रोत्साहित करा, मुलींची लग्नं लवकर करुन देण्यापेक्षा त्यांना शिकू द्या, खेळू द्या असं आवाहनही यावेळी सेहवागने देशवासियांना केलं.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Belgium’s King Philippe and Queen Mathilde plays Cricket at Mumbai’s Oval Stadium latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV