‘बेस्ट’ बजेट : भाडेवाढीच्या प्रस्तावासह खासगी बस आणण्याचाही विचार

बेस्टला चालू वर्षात 590 कोटींचा तोटा झाल्याचं या अर्थसंकल्पातून समोर आलं आहे. इतकंच नाही, तर चालू वर्षातल्या पालिकेच्याच बजेटला अंतिम मंजुरी मिळालेली नसताना बेस्टनं पुढच्या वर्षीचा आपला 5 हजार 724 कोटींचा अर्थसंकल्प बेस्टच्या समितीत सादर केला आहे.

‘बेस्ट’ बजेट : भाडेवाढीच्या प्रस्तावासह खासगी बस आणण्याचाही विचार

मुंबई : मुंबई महापालिकेच्या ‘बेस्ट’ने बजेट सादर केले आहे. यात भाडेवाढीचा प्रस्ताव आहे. शिवाय, आतापर्यंत स्वत:च्या बस चालवणारी ‘बेस्ट’ आता खासगी बस घेऊन सेवा देण्याच्याही विचारात आहे.

बेस्टला चालू वर्षात 590 कोटींचा तोटा झाल्याचं या अर्थसंकल्पातून समोर आलं आहे. इतकंच नाही, तर चालू वर्षातल्या पालिकेच्याच बजेटला अंतिम मंजुरी मिळालेली नसताना बेस्टनं पुढच्या वर्षीचा आपला 5 हजार 724 कोटींचा अर्थसंकल्प बेस्टच्या समितीत सादर केला आहे.

2018-19 मध्ये ‘बेस्ट’ची प्रस्तावित भाडेवाढ :

‘बेस्ट’च्या तिकीट दरात पहिल्या 4 किलोमीटरपर्यंतच्या भाडे किंमतीत कोणतेही बदल करण्यात आले नाही. मात्र 4 किलोमीटरनंतर 1 रुपया ते 12 रुपयांपर्यंत भाडेवाढ सूचवण्यात आली आहे.

प्रस्तावित भाडेवाढ अशी असेल :

  • 6 किमीसाठी सध्या भाडे – 14 रु. (प्रस्तावित भाडे - 15 रु.)

  • 8 किमीसाठी सध्या भाडे - 16 रु. (प्रस्तावित भाडे – 18 रु.)

  • 10 किमीसाठी सध्या भाडे – 16 रु. (प्रस्तावित भाडे – 22 रु.)


बस पासच्या किंमतीतही पहिल्या चार किमीसाठी कोणतेही बदल नाही. त्यापुढे 40 रुपये ते 350 रुपये भाडेवाढ प्रस्तावित आहे. तर शालेय विद्यार्थ्यांच्या पास किंमतीत चार किमीपर्यंत बदल नाहीत. त्यापुढे 50 ते 100 रु वाढ प्रस्तावित आहे.

खासगी बसची सेवा :


बेस्ट आतापर्यंत स्वत:च्या बस चालवत आहे. मात्र होणारा तोटा लक्षात घेता बेस्ट 2018-19 मध्ये खासगी बस घेऊन सेवा देण्याच्या विचारात आहे. यासाठी बेस्टने तब्बल 800 खासगी बस भाडेतत्त्वावर घेऊन चालवण्याचे प्रस्तावित केले आहे.

यात सामान्य स्वरुपाच्या बस, मिनी एसी बस, मिनी बस, विकलांगांसाठी खास बस अशा एकूण 800 बस भाडेतत्त्वावर घेण्याचे प्रस्तावित केले आहे. येत्या वर्षात बेस्टच्या 600 हून अधिक बसेसची आयुमर्यादा संपत असल्यानं भाडेतत्त्वावर बस घेण्याचे प्रस्तावित केले आहे.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
अधिक माहिती: best budget बजेट बेस्ट
First Published:
LiveTV