बेस्ट कर्मचाऱ्यांचा दिवाळी बोनस पगारातून कापणार

बेस्टच्या कर्मचाऱ्यांना मिळालेला दिवाळी बोनस आता त्यांच्या पगारातून कापण्यात येणार आहे.

बेस्ट कर्मचाऱ्यांचा दिवाळी बोनस पगारातून कापणार

मुंबई : बेस्टच्या कर्मचाऱ्यांना मिळालेला दिवाळी बोनस आता त्यांच्या पगारातून कापण्यात येणार आहे. स्थायी समितीमध्ये कोणत्याही चर्चेशिवाय प्रशासनाची सूचना मंजूर करण्यात आली आहे.

बेस्ट कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी प्रत्येकी 5 हजार 500 रुपये बोनस देण्यात आला होता. त्यासाठी मुंबई महापालिकेने बेस्टला 21 कोटी 64 लाख रुपये दिले होते. मात्र, बेस्टमधील आर्थिक सुधारणांची प्रक्रिया तात्काळ सुरु करण्याची अट घातली होती.

ही अट पूर्ण न केल्यास दिलेली रक्कम कर्मचाऱ्यांच्या पगारातून कापण्याचं ठरलं होतं. त्यानुसार आता 11 समान हप्त्यांमध्ये बोनसची रक्कम कर्मचाऱ्यांकडून वसूल केली जाणार आहे.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: BEST employees bonus will be deducted from salary latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV