भिडे गुरुजींच्या मुंबईतील व्याख्यानाला पोलिसांनी परवानगी नाकारली!

मुंबईतील लालबाग येथे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने 7 जानेवारीला म्हणजे येत्या रविवारी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

भिडे गुरुजींच्या मुंबईतील व्याख्यानाला पोलिसांनी परवानगी नाकारली!

मुंबई : श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या भिडे गुरुजींचं मुंबईतील नियोजित व्याख्यान पुढे ढकलण्यात आले आहे. मुंबई पोलिसांनी कोरेगाव-भीमा हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर या व्याख्यानाला परवानगी नाकारली.

मुंबईतील लालबाग येथे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने भिडे गुरुजींचं 7 जानेवारीला म्हणजे येत्या रविवारी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. गेल्या एक महिन्यापासून या व्याख्यानाची तयारी केली जात होती. जवळपास 5 हजार लोक उपस्थित राहतील, अशी व्यवस्थाही इथे करण्यात आली होती.

"कोरेगाव-भीमा हिंसाचार झाल्यानंतर, त्यात भिडे गुरुजींचं नाव गोवण्यात आले. त्यामुळे जातीयवादी वाद-विवाद, तसेच दंगल होऊ नये म्हणून व्याख्यान पुढे ढकलण्याची भूमिका घेतली आहोत.", असे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या बलवंत दळवी यांनी सांगितले.

बामसेफ, संभाजी ब्रिगेड यांनी एल्गार परिषदेचं आयोजन केलं होतं. त्यामुळे कोरेगाव भीमा हिंसाचारात त्यांचा हात असण्याची शक्यता आहे, असा आरोपही श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानने केला आहे.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Bhide Guruji lecture postponed latest updates
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV