क्रीडा मानसशास्त्रज्ञ भीष्मराज बाम कालवश

By: | Last Updated: > Saturday, 13 May 2017 12:05 AM
क्रीडा मानसशास्त्रज्ञ भीष्मराज बाम कालवश

नाशिक : क्रीडा मानसशास्त्रज्ञ भीष्मराज बाम कालवश झाले आहेत. व्याख्यान देण्यासाठी गेले असताना हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने भीष्मराज बाम यांचं निधन झालं. वयाच्या 83 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी सुधा, मुलगा नरेंद्र आणि अजित असा परिवार आहे.

क्रीडा मानसशास्त्रज्ञ म्हणून भीष्मराज बाम यांचं नाव क्रीडा क्षेत्रात अत्यंत आदराने घेतलं जातं. ऑलिम्पिकसह विविध क्रीडा स्पर्धांमध्ये पदकांची कमाई करणाऱ्या अनेक खेळाडूंना भीष्मराज बाम यांनी मार्गदर्शन केले आहे.

सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, अंजली भागवत, कविता राऊत, पी. गोपीचंद यांच्यासह अनेक खेळाडूंना भीष्मराज बाम हे मार्गदर्शक म्हणून लाभले.

‘मार्ग यशाचा’, ‘संधीचं सोनं करणारी इच्छाशक्ती’, ‘विजयाचे मानसशास्त्र’, ‘मना सज्जना’ यांसारखी पुस्तकंही भीष्मराज बाम यांनी लिहिली. या पुस्तकांचा हिंदी, पंजाबी आणि तामिळ भाषेतही अनुवाद झाला. याचबरोबर मराठीतील अनेक वृत्तपत्रांमध्ये बाम यांनी स्तंभलेखनही केले.

1963 साली महाराष्ट्र पोलिस सेवेत पोलिस उपाधीक्षक म्हणून ते रुजू झाले. 18 वर्षांच्या सेवेनंतर त्यांची गृहमंत्रालयात महत्त्वाच्या पदावर नेमणूक झाली. त्यानंतर पुढे ते पोलिस महानिरिक्षक म्हणून निवृत्त झाले. ‘दक्षता’ या पोलिस मासिकाचे ते दोन वर्षे मुख्य संपादकही होते.

भीष्मराज बाम यांच्या अंत्यदर्शनासाठी पोलिस अधिकारी, खेळाडू आणि मान्यवरांची गर्दी झाली आहे. शनिवारी सकाळी 10 वाजता त्यांच्यावर अंत्यविधी होणार आहे.

First Published:

Related Stories

भारतात घुसखोरी करणाऱ्या पाक सैनिकांकडे शस्त्रास्त्रांसह खास सापळे
भारतात घुसखोरी करणाऱ्या पाक सैनिकांकडे शस्त्रास्त्रांसह खास...

जम्मू : पाकिस्तानी लष्कराच्या बॉर्डर अॅक्शन टीमने (BAT) नियंत्रण

21 'आप' आमदारांवर निलंबनाची टांगती तलवार
21 'आप' आमदारांवर निलंबनाची टांगती तलवार

नवी दिल्ली: आम आदमी पक्षाच्या मोठा झटका बसला आहे. कारण त्यांच्या 21

पंतप्रधान मोदी अमेरिकेसह तीन देशांच्या दौऱ्यावर रवाना
पंतप्रधान मोदी अमेरिकेसह तीन देशांच्या दौऱ्यावर रवाना

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 4 दिवसीय परदेश

VIDEO: ओदिशातल्या रायगडात दोन कोब्रा एकत्र, व्हिडिओ व्हायरल
VIDEO: ओदिशातल्या रायगडात दोन कोब्रा एकत्र, व्हिडिओ व्हायरल

रायगडा (ओदिशा): एखाद्या चित्रपटात दिसणारं क्रोबाचं दृश्यं

‘त्या' पोस्टरनं बुमराह नाराज, जयपूर ट्रॅफिक पोलिसांना सुनावलं!
‘त्या' पोस्टरनं बुमराह नाराज, जयपूर ट्रॅफिक पोलिसांना सुनावलं!

मुंबई: चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारताचा

सलगच्या सुट्ट्यांमुळे तीन दिवस बँका बंद
सलगच्या सुट्ट्यांमुळे तीन दिवस बँका बंद

मुंबई : आजपासून सलग तीन दिवस देशातल्या सर्व बँका बंद राहणार आहेत.

राष्ट्रपतीपदाचा अर्ज भरल्यानंतर लालकृष्ण अडवाणी एकाकी?
राष्ट्रपतीपदाचा अर्ज भरल्यानंतर लालकृष्ण अडवाणी एकाकी?

नवी दिल्ली : एनडीएचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांनी

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 23/06/2017
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 23/06/2017

नीट परीक्षेचा निकाल जाहीर, पुण्याचा अभिषेक डोगरा राज्यात पहिला,

6 जनपथवर पवार-फडणवीस भेटीत नेमकं काय झालं?
6 जनपथवर पवार-फडणवीस भेटीत नेमकं काय झालं?

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत जेव्हा एनडीएच्या राष्ट्रपती

'नीट'मध्ये पुण्याचा अभिषेक राज्यात अव्वल, देशात पाचवा
'नीट'मध्ये पुण्याचा अभिषेक राज्यात अव्वल, देशात पाचवा

नवी दिल्ली : सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (सीबीएसई)