भिवंडीत फ्रिजचा स्फोट, आगीत किचन जळून खाक

इमारतीत राहणाऱ्या 25 ते 30 रहिवाशांना सुरक्षितपणे इमारतीबाहेर काढण्यात आलं.

भिवंडीत फ्रिजचा स्फोट, आगीत किचन जळून खाक

भिवंडी : भिवंडी शहरात शॉर्ट सर्किटमुळे फ्रिजमध्ये स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. स्फोट इतका भीषण होता, की या स्फोटात संपूर्ण किचन जळून खाक झालं, तर फ्रिजचे तुकडे उडाले.

भिवंडी शहरातील निजामपुरा परिसरात फ्रिजमध्ये स्फोट झाल्याने एकच खळबळ उडाली. या इमारतीत राहणाऱ्या 25 ते 30 रहिवाशांना सुरक्षितपणे इमारतीबाहेर काढण्यात आलं. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि निजामपूर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाने या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. अग्निशमन दलाच्या जवानांनी किचनमधून दोन सिलेंडर बाहेर काढले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Bhiwandi : Fridge blast set kitchen on fire latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV