भिवंडीत उड्डाणपुलाचा भाग कारवर कोसळून वाहतूक कोंडी

या घटनेमुळे उड्डाणपूल उभारणाऱ्या कंपनीच्या कार्यप्रणाली आणि सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

भिवंडीत उड्डाणपुलाचा भाग कारवर कोसळून वाहतूक कोंडी

भिवंडी : भिवंडी-कल्याण मार्गावर उड्डाणपुलाचा काही भाग कारवर कोसळल्यामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. यामध्ये गाडीचं काहीसं नुकसान झालं आहे, मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

नेहरुनगर परिसरात एमएमआरडीएकडून उड्डाणपूल बांधला जात आहे. रात्री नऊ वाजताच्या सुमारास उड्डाणपुलाचं काम सुरु असताना त्याचा काही भाग कारवर कोसळला. त्यानंतर खबरदारी म्हणून काही काळ वाहतूक थांबवण्यात आली. त्यानंतर चार किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

या घटनेमुळे उड्डाणपूल उभारणाऱ्या कंपनीच्या कार्यप्रणाली आणि सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. भविष्यात हा उड्डाणपूल खऱ्या अर्थाने सुरक्षित असेल का अशी चर्चा नागरिक करत आहेत.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Bhiwandi : Part of flyover falls on car latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV