मुंबईत कांजूरमार्गमध्ये स्टुडिओला भीषण आग

कांजूरमार्गमध्ये गांधी नगर परिसरात एका स्टुडिओला मोठी आग लागली आहे. सिने विस्ता असं स्टुडिओचं नाव असून अग्नीशमन दलाच्या 6 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

मुंबईत कांजूरमार्गमध्ये स्टुडिओला भीषण आग

मुंबई : कांजूरमार्गमध्ये गांधी नगर परिसरात एका स्टुडिओला मोठी आग लागली आहे. सिने विस्ता असं स्टुडिओचं नाव असून अग्नीशमन दलाच्या 6 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

कांजूरमार्गमधील पवई टेलिफोनसमोर हा सिनेविस्टा नावाचा स्टुडिओ आहे. या स्टुडिओत प्रामुख्याने हिंदी मालिकांचे शूटिंग चालतं. तसंच जुन्या थीमचा सेटही या स्टुडिओत उभारण्यात आला होता. या स्टुडिओत कुणी अडकलं आहे का? याबद्दल अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.

दरम्यान अग्नीशमन दलाने 2 नंबरचा कॉल दिल्याने आग विझवण्यासाठी 10 ते 12 गाड्या आग विझवण्यासाठी दाखल होणार आहेत.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: big fire in kanjurmarg m
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV