मुंबईत मानखुर्दमध्ये स्क्रॅप कंपाऊंडला भीषण आग

मानखुर्दमधील मंडाळा परिसरात एका स्क्रॅप कंपाऊंडला भीषण आग लागली आहे. आज दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास ही आग लागली असून अग्नीशमन दलाच्या 10 ते 15 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरु आहे.

मुंबईत मानखुर्दमध्ये स्क्रॅप कंपाऊंडला भीषण आग

मुंबई : मानखुर्दमधील मंडाळा परिसरात एका स्क्रॅप कंपाऊंडला भीषण आग लागली आहे. आज दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास ही आग लागली असून अग्नीशमन दलाच्या 10 ते 15 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरु आहे.

आज रविवारी दुपारी मानखुर्दच्या मंडाळा परिसरातील कुर्ला स्क्रप कंपाऊंडला मोठी आग लागली. ही आग इतकी मोठी आहे की आगीच्या ज्वाळा घाटकोपरमधूनही पाहता येऊ शकतात. अग्नीशमन दल घटनास्थळी दाखल झालं असून आग विझवण्याचं काम सुरु आहे. मात्र केमिकलमुळे आग विझवण्यात अडचणी येत आहेत.

गेल्या काही दिवसांमध्ये या परिसरात आग लागण्याचे प्रकार वाढले आहे. दरम्यान ही आग कशामुळे लागली, याची माहिती अद्याप उपलब्ध होऊ शकलेली नाही. या परिसरात केमिकल आणि भंगाराची गोडाऊन असल्यामुळे आग पसरु नये याचा प्रयत्न सुरु आहे.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: big fire
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV