नवी मुंबईत उघड्या चेंबरमध्ये पडून बाईकस्वाराचा मृत्यू

नवी मुंबईत रस्त्यावरील उघड्या चेंबरमध्ये पडून दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उलवे येथे घडली आहे.

नवी मुंबईत उघड्या चेंबरमध्ये पडून बाईकस्वाराचा मृत्यू

नवी मुंबई : नवी मुंबईत रस्त्यावरील उघड्या चेंबरमध्ये पडून दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उलवे येथे घडली आहे. मोहन राठोड असं मृत व्यक्तीचं नाव आहे.

राठोड हे उलवे सेक्टर 20 मध्ये राहत होते. काल (सोमवार) रात्री दीड वाजेच्या सुमारास ते बाईकवरून घरी जात होते. पण रस्त्यावरील उघडा असलेला चेंबर त्यांना न दिसल्याने ते सरळ दुचाकीसह चेंबरमध्ये जाऊन पडले. याच वेळी दुचाकीने अचानक पेट घेतला. राठोड हे चेंबरमध्येच अडकल्यानं त्यांना बाहेर पडता आलं नाही आणि त्यांचा जळून दुर्दैवी मृत्यू झाला.

संपूर्ण उलवे रोडवर अशाच पद्धतीने चेंबर्स उघडे असल्याने अनेकांचा अपघात झाला आहे. या प्रकरणी ठेकेदारावर एनआरआय पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे एका नागरिकाला आपल्या जीवाला नाहक मुकावं लागलं आहे.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Bike driver dies after falling in open chamber in Navi Mumbai latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV