कंटेनरच्या चाकाखाली येऊन बाईक रायडरचा जागीच मृत्यू

वरुण हा एअरलाईन्समध्ये पायलट म्हणून जॉईन होणार होता. त्यासंदर्भातील त्याचं प्रशिक्षणही पूर्ण झालं होतं.

कंटेनरच्या चाकाखाली येऊन बाईक रायडरचा जागीच मृत्यू

वसई : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर अपघातात बाईक रायडरचा जागच्या जागीच मृत्यू झाला. वरुण बामरोटिया असे 28 वर्षीय बाईक रायडरचं नाव आहे.

मुंबई अहमदाबाद मार्गावर वसई फाट्याजवळ कंटेनरच्या चाकांखाली वरुण बामरोटियाची बाईक आली आणि वरुणचा जागीच मृत्यू झाला. आज सकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.

Varun 1

वरुण बामरोटिया हा ठाण्यातील रहिवाशी असून, BMW GS बाईकवरुन तो प्रवास करत होता. भरधाव कंटेनरखाली आल्याने त्याची जीवनयात्रा संपली.

वरुण हा एअरलाईन्समध्ये पायलट म्हणून जॉईन होणार होता. त्यासंदर्भातील त्याचं प्रशिक्षणही पूर्ण झालं होतं.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Bike Rider killed in Accident in Vasai latest updates
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV