भाजप पदाधिकाऱ्याची गुंडगिरी, महिलेचे केस धरुन बेदम मारहाण

मी लेडीजला कोणतीही मारहाण केली नाही, असं स्पष्टीकरण भाजपचे पदाधिकारी जे. पी. सिंग यांनी दिले.

BJP leader attacked on women in nalasopara latest updates

नालासोपारा (ठाणे) : नालासोपाऱ्यात भाजपा पदाधिका-याची दादागिरी समोर आली आहे. सोसायटीतील पार्किंगच्या किरकोळ वादातून भाजपा पदाधिकाऱ्यांनी एका महिलेसह तिच्या पतीला केस धरुन बेदम मारहाण केली.

धक्कादायक म्हणजे, पिडित महिलेने भाजपा पदाधिकाऱ्याची तक्रार तुळिंज पोलिस ठाण्यात केली. मात्र एवढी मारहाण होऊनही पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याचीच नोंद केली.

मला गुन्हा दाखल करायचा आहे, माझा FIR घ्या, असे सांगत असतानाही महिलेकडे तुळिंज पोलिसांनी दुर्लक्षच केल्याचे समोर आले आहे.

नालासोपारा पूर्वेकडील ओसवाल नगरी या परिसरात लोटस ही इमारत आहे. या इमारतीच्या सहाव्या मजल्यावर लिना आणि मनोजकुमार दुहन हे कुटुंबीय राहतात. याच इमारतीमध्ये भाजपचे पदाधिकारी जे. पी. सिंगही राहतात.

जे. पी. सिंग हे भाजपाच्या उत्तर भारतीय मोर्चाचे ठाणे-पालघर विभागाचे अध्यक्ष आहेत.

सोसायटीमध्ये पार्किंगच्या कारणावरुन अपसात वाद सुरु झाला होता. हा वाद सुरु असतांना मनोजकुमार दुहन यांनीही दुचाकी पार्किंगमध्ये चारचाकी पार्किंग का करता, याच वादातून चक्क जे. पी. सिंग यांनी मनोजकुमार यांना मारण्यास सुरवात केली असल्याचा आरोप आहे.

एवढेच नाही तर आपल्या पतीला मारले जाते, हे पाहून लिना दुहनही सहाव्या मजल्यावरुन खाली उतरल्या आणि माझ्या नवऱ्याला का मारले असा जाब विचारला असता, जे. पी. सिंग याने लिना यांचे केस धरुन त्यांच्या तोंडावर बेदम मारहाण केली असल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

याबाबत मारहाण झालेले पीडित कुटुंब तुळींज पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले असता तुमच्या सोसायटीचा वाद आहे. तुम्ही आपसात मिटवा असे सांगून केवळ अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

जे. पी. सिंग आणि त्याचा साथीदार हे दोघेही दारु प्यायले होते. पोलिस ठाण्यात यांचे मेडिकल करा असे सांगून ही मेडिकल न करता त्यांना सोडून देण्यात आल्याचा आरोपही महिलेने केला आहे.

एका भाजपा पदाधिकाऱ्याने बेदम मारहाण करुनही पोलीस गुन्हा दाखल करुन घेत नाहीत. एका महिलेला मारहाण होते आणि पोलिस मात्र भाजपा पदाधिकाऱ्याला साथ देतात, असा आरोपही पीडित महिलेने केला आहे.

याबाबत भाजपाच्या पदाधिकाऱ्याला विचारले असता त्यानी आरोप खोटे असल्याचं सांगितलं आहे. मी फक्त सोडवण्याचा प्रयत्न करत होते. मी लेडीजला कोणतीही मारहाण केली नाही, असं स्पष्टीकरण भाजपचे पदाधिकारी जे. पी. सिंग यांनी दिले.

Mumbai News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:BJP leader attacked on women in nalasopara latest updates
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

मनसेनं संजय निरुपमांची सभा उधळली, कार्यकर्ते भिडले
मनसेनं संजय निरुपमांची सभा उधळली, कार्यकर्ते भिडले

मुंबई : मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांची घाटकोपरमधील सभा

मुंबईत मध्य रेल्वेवर आज विशेष मेगाब्लॉक
मुंबईत मध्य रेल्वेवर आज विशेष मेगाब्लॉक

मुंबई : मध्य रेल्वेवर आज शनिवारी कल्याण-कसारा मार्गावर विशेष

माटुंगाजवळ रेल्वे रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
माटुंगाजवळ रेल्वे रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक...

मुंबई : माटुंगा रेल्वे स्टेशनजवळ रेल्वे ट्रॅकला तडे गेल्यानं मध्य

नाताळच्या मुहूर्तावर ‘मुंबई टू गोवा’ क्रूझ प्रवासाला सुरुवात  
नाताळच्या मुहूर्तावर ‘मुंबई टू गोवा’ क्रूझ प्रवासाला सुरुवात  

मुंबई : मुंबई ते गोवा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रूझ प्रवासाला आता

सर्व्हिस चार्ज आकारल्यानं रेस्टॉरंटला तब्बल 10 हजारांचा दंड!
सर्व्हिस चार्ज आकारल्यानं रेस्टॉरंटला तब्बल 10 हजारांचा दंड!

मुंबई : मुंबईतल्या लोअर परळ भागात असलेल्या पंजाब ग्रील या

गाडी टोईंग करण्यापूर्वी भोंग्यावरुन सूचना, नवी नियमावली जारी
गाडी टोईंग करण्यापूर्वी भोंग्यावरुन सूचना, नवी नियमावली जारी

मुंबई : मालाडमध्ये झालेल्या टोईंगच्या वादानंतर वाहतूक विभागाचे

ठाण्यातल्या दिवा परिसरात 9 किलोची स्फोटकं जप्त
ठाण्यातल्या दिवा परिसरात 9 किलोची स्फोटकं जप्त

  ठाणे : ठाण्यातल्या दिवा परिसरात खर्डी जंक्शनमध्ये मोठ्या

संजय निरुपमांना सुप्रीम कोर्टाचा दणका, फेरीवाल्यांची याचिका फेटाळली
संजय निरुपमांना सुप्रीम कोर्टाचा दणका, फेरीवाल्यांची याचिका...

नवी दिल्ली : काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी

ठाण्यात मनसेचा राडा, परप्रांतीय मच्छिमारांना मारहाण
ठाण्यात मनसेचा राडा, परप्रांतीय मच्छिमारांना मारहाण

ठाणे : ठाण्याच्या मनसेनं ‘खळ्ळ खटॅक’ केलं आहे. कोलबाड परिसरात

भिवंडीत इमारत कोसळली, चौघांचा मृत्यू, इमारतीचा मालक अटकेत
भिवंडीत इमारत कोसळली, चौघांचा मृत्यू, इमारतीचा मालक अटकेत

भिवंडी (मुंबई) : भिवंडी इमारत दुर्घटनेत मृतांचा आकडा चौघांवर