राष्ट्रवादीच्या नगरसेवकाची भाजप पदाधिकाऱ्याला मारहाण

नवीन गवते यांनी हरिश पांडे यांचा गळा आवळला आहे. नवीन गवते हे राष्ट्रवादीचे नगरसेवक असून त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. दिघा अनधिकृत प्रकारणाचा गुन्हा त्यांच्यावर दाखल आहे.

राष्ट्रवादीच्या नगरसेवकाची भाजप पदाधिकाऱ्याला मारहाण

नवी मुंबई : भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाचे नवी मुंबई जिल्हा सरचिटणीस हरीश पांडे यांना राष्ट्रवादीचे दिघा येथील नगरसेवक नवीन गवते यांनी मारहाण केली आहे. आपल्या 10 ते 15 कार्यकर्त्यांना घेऊन नवीन गवते यांनी पांडेंना मारहाण केली. हरीश पांडे यांना मारहाण करतानाचा व्हिडीओ समोर आला आहे.

दिघा येथील एका बांधकाम व्यावसायिकाकडे काम घेण्यावरुन ही मारहाण झाल्याचे बोलले जात आहे. नवीन गवते आणि त्यांच्या साथीदारांनी लाथाबुक्यांनी मारहाण केल्याचे व्हिडीओमधून दिसत आहे.

नवीन गवते यांनी हरिश पांडे यांचा गळा आवळला आहे. नवीन गवते हे राष्ट्रवादीचे नगरसेवक असून त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. दिघा अनधिकृत प्रकारणाचा गुन्हा त्यांच्यावर दाखल आहे.

नगरसेवकाकडून अशा पद्धतीने मारहाण करुन लोकांमध्ये दहशत पसरवली जात असल्याने लोकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

या प्रकरणी रबाले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. मारहाणीत हरीश पांडे यांना दुखापत आली असून, उपचारासाठी वाशी मनपा रुग्णालयात दाखल केले आहे.

पाहा बातमीचा व्हिडीओ:

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: BJP leader beaten by NCP corporator latest updates
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV