भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा 'लाल दिव्याच्या' गाडीनं ठाण्यात!

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा 'लाल दिव्याच्या' गाडीनं ठाण्यात!

ठाणे: एकीकडे पंतप्रधान मोदींनी लालदिवा वापरण्यास मनाई केली असली तर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज लाल दिव्याच्या गाडीत येणंच पसंत केलं. ठाण्यामध्ये आज सावरकर संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यासाठी ते ठाण्यात आले होते.

अमित शहांना झेड प्लस सुरक्षा असल्यामुळे त्यांना लाल दिव्याची गाडी आहे. खरं तर मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस, केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरींनी तातडीनं लाल दिवा हटवला. आता, अमित शहा आपल्या गाडीवरील लाल दिवा कधी हटवणार? हे पाहणं महत्वाचं आहे. तांत्रिकदृष्ट्या 1 मेपर्यंत लाल दिवा वापरण्यासाठी मुदत आहे.

राष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्री ते अधिकारी यांचा प्रत्येकाचा लाल दिवा आता जाणार आहे. दोन दिवसापूर्वी (19 एप्रिल 2017) झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे लाल दिव्याची प्रथा मोडीत काढत पंतप्रधान मोदींनी व्हीव्हीआयपी कल्चरला फाटा दिला आहे. यापुढे फक्त अत्यावश्यक सेवा म्हणजेच रुग्णवाहिका, अग्निशमन दल, आपत्ती निवारण आणि पोलिसांच्या गाड्यांनाचा निळा दिवा असणार आहे.

संबंधित बातम्या:

स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे अंधारात तळपणारी वीज : अमित शाह


राष्ट्रपती, पंतप्रधानांपासून अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांचा लाल दिवा कायमचा बंद!

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
अधिक माहिती: amit shah BJP national president red beacon car thane travel
First Published:

Related Stories

LiveTV