राणेंच्या प्रवेशावर अमित शाहांची संघ पदाधिकाऱ्यांशी चर्चा?

साधारण पाऊण तास सुरु असलेल्या या बैठकीचा मुख्य केंद्रबिंदू नारायण राणे हेच असल्याची माहिती आहे.

राणेंच्या प्रवेशावर अमित शाहांची संघ पदाधिकाऱ्यांशी चर्चा?

मुंबई : नारायण राणे यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाबाबत भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघात खलबतं सुरु झाल्याची चर्चा आहे. मुंबई दौऱ्यावर असलेले भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी दादरमधल्या संघ कार्यालयाला भेट दिली.

संघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत अमित शाह यांची सकाळी बैठक झाली. साधारण पाऊण तास सुरु असलेल्या या बैठकीचा मुख्य केंद्रबिंदू नारायण राणे हेच असल्याची माहिती आहे.

राणेंच्या भाजप प्रवेशाला अनेक भाजप नेत्यांनी विरोधी सूर आळवला आहे. त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राणेंच्या संभाव्य पक्षप्रवेशाकडे कसं पाहतं, हेसुद्धा महत्त्वाचं आहे.

अमित शाहांसोबतची बैठक संपली, राणेंचा भाजप प्रवेश गुलदस्त्यातच


दरम्यान, नारायण राणेंचा भाजप प्रवेश दिवाळीनंतरच होण्याची शक्यता असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. राज्यातील काही ग्रामपंचायतींच्या निवडणुकांनंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. त्यानंतर राणेंच्या पक्षप्रवेशाचा निर्णय घेतला जाईल. दिवाळीपर्यंत भाजप 'वेट अँड वॉच'च्या भूमिकेत असल्याची माहिती आहे.

सोमवारी अमित शाह यांची भेट घेण्यासाठी नारायण राणे सकाळीच दिल्लीत दाखल झाले होते. भाजपच्या कार्यकारिणीची बैठक संपल्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या दिल्लीतल्या घरी राणे, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची बैठक पार पडली. या बैठकीसाठी काही वेळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते. मात्र नंतर परिवहन खात्यातील एका महत्त्वाच्या बैठकीसाठी ते निघून गेले.

या बैठकीनंतर नारायण राणे, चंद्रकांत पाटील आणि रावसाहेब दानवे एकाच गाडीतून अमित शाह यांच्या घरी दाखल झाले. अमित शाह यांच्या घरी सर्व नेत्यांमध्ये बैठक झाली. मात्र या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली, हे मात्र अजून समोर आलेलं नाही.

नारायण राणे हे सिंधुदुर्गातल्या हॉस्पीटलच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यासाठी दिल्लीत आले होते. बैठकीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, असा अजब दावा बैठकीनंतर रावसाहेब दानवेंनी केला. मात्र एवढं जाहीरपणे दिल्लीत येणं, भाजप नेत्यांच्या गाडीत फिरणं, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी आणि पक्षाध्यक्षाशी चर्चा करणं यांमुळे एकंदरीत राणेंसाठी भाजपचे दरवाजे उघडले आहेत, असं बोललं जात आहे.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV