भाजप ही मुंबईची घाण, पूनम महाजनांवर मनसेची टीका

"भाजप ही मुंबईची घाण आहे", अशी टीका मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केली.

भाजप ही मुंबईची घाण, पूनम महाजनांवर मनसेची टीका

मुंबई: उत्तर भारतीय हे मुंबईची शान आहे असं म्हणणाऱ्या भाजप खासदार पूनम महाजन यांच्यावर मनसेने हल्लाबोल केला.

"भाजप ही मुंबईची घाण आहे", अशी टीका  मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केली.

https://twitter.com/SandeepDadarMNS/status/932835306457518081

उत्तर भारतीय हे मुंबईची शान आहेत, ते आपल्या मेहनतीने मुंबईच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत, असं वक्तव्य भाजप युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष खासदार पूनम महाजन यांनी केलं होतं.

मुंबईतील साकीनाका इथं रविवारी उत्तर भारतीय संमेलन आणि कलाकार सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता, त्या कार्यक्रमात पूनम महाजन बोलत होत्या.

पूनम महाजन काय म्हणाल्या?

“मुंबईचं एक वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे इथे जो कोणी येईल, तो इथलाच होऊन जातो. उत्तर भारतीय हे मुंबईची शान आहेत, ते आपल्या मेहनतीने मुंबईच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. आम्हाला भाषा-प्रांत वादावरुन देशाचे तुकडे करायचे नाहीत. उत्तर-दक्षिण भारत ही आपली संस्कृती आहे.

उत्तर भारतीयांची शक्ती आम्हाला नाकारता येणार नाही. उत्तर भारतीयांनी आम्हाला  मोठे नेते आणि अनेक पंतप्रधान दिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: वाराणसीतून येतात.

उत्तर भारत दौऱ्यात माझ्यासारख्या मराठी मुलीला सन्मान मिळाला आणि मिळत राहील.” असं पूनम महाजन म्हणाल्या.

दिग्गजांचा सत्कार

दरम्यान या कार्यक्रमात पद्मभूषण गायक उदित नारायण, दीपा नारायण, अभिनेता पवन सिंह, सुनील पाल, दिग्दर्शक आनंद डी घटराज, मनोज तिवारी, अभिनेत्री अंजना सिंह, पूनम दुबे, प्रियांका पंडित, गीतकार राधा मौर्या यांच्यासह दिग्गजांना सन्मान करण्यात आला.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: BJP yuva morcha president Poonam Mahajan says, North indians are Pride of Mumbai
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV