भांडुप पोटनिवडणुकीत भाजपचा विजय, सत्ता समीकरणं कशी बदलणार?

2 अपक्षांचा भाजपला पाठिंबा असल्याने संख्याबळ 84 आहे. भांडुपमध्ये भाजपच्या जागृती पाटील विजयी झाल्याने भाजपचं संख्याबळ 85 झालं आहे.

भांडुप पोटनिवडणुकीत भाजपचा विजय, सत्ता समीकरणं कशी बदलणार?

मुंबई : भांडुप येथील पोटनिवडणुकीच्या निकालानंतर मुंबई महापालिकेतील सत्ता समीकरणांमध्ये बदल होऊ शकतो. सध्या भाजपचे निवडून आलेले 82 नगरसेवक आहेत. तर 2 अपक्षांचा भाजपला पाठिंबा असल्याने संख्याबळ 84 आहे. भांडुपमध्ये भाजपच्या जागृती पाटील विजयी झाल्याने भाजपचं संख्याबळ 85 झालं आहे.

शिवसेनेचे निवडून आलेले नगरसेवक 84 आहेत. तर 4 सहयोगी अपक्षांचा पाठिंबा असल्याने शिवसेनेचं संख्याबळ 88 आहे. यात अपक्षांपैकी चंगेज मुलतानी चुकीच्या जात प्रमाणपत्रामुळे अपात्र ठरतील. मात्र त्या ठिकाणी राजू पेडणेकर या शिवसेनेच्याच दुसऱ्या क्रमांकाची मतं घेतलेल्या उमेदवाराची वर्णी लागेल. त्यामुळे सदस्यसंख्या 88 एवढीच राहिल.

दरम्यान भांडुपमध्ये भाजपच्या जागृती पाटील यांचा विजय झाला आहे. त्यामुळे बीएमसीतील सत्ता समीकरणं पुन्हा बदलतात का, ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. शिवसेनेपेक्षा भाजपचे तीन सदस्य कमी आहेत.

मुंबई महापालिकेतील पक्षीय बलाबल

  • शिवसेना अपक्षांसह - 88

  • भाजप अभासे आणि एक अपक्षासह - 85

  • कॉंग्रेस - 30

  • राष्ट्रवादी कॉंग्रेस - 9

  • मनसे - 7

  • सपा - 6

  • एमआयएम - 2


संबंधित बातमी : Live Update : मुंबई, नागपूर, पुणे, कोल्हापूर पोटनिवडणूक निकाल

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV