एक्झिट पोल: मुंबईत भाजपला 80 ते 88 जागांचा अंदाज

एक्झिट पोल: मुंबईत भाजपला 80  ते 88 जागांचा अंदाज

मुंबई: राज्यातील १० महापालिका आणि ११ जिल्हा परिषदांसाठी मोठ्या उत्साहात मतदान झालं आहे. त्यामुळे आता सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

अॅक्सिस - इंडिया टुडे यांचा एक्झिट पोलने अंदाज व्यक्त केला आहे. त्यानुसार मुंबईत शिवेसना -भाजपमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळतेय.

अॅक्सिस - इंडिया टुडे यांचा एक्झिट पोल - मुंबई

शिवसेना  - 86 ते 92

भाजप -  80  ते 88

काँग्रेस - 30 ते 34

मनसे - 5 ते 7

राष्ट्रवादी - 3 ते 6

MUMBAI_POLL

ठाणे-
भाजप- 26-33
शिवसेना - 62 - 70
काँग्रेस 2- 6
राष्ट्रवादी 29 - 34

THANE_POLL
नागपूर-
भाजप 98-110
काँग्रेस 35-41
शिवसेना- 2-4

NAGPUR_POLL

अॅक्सिस आणि इंडिया टुडेच्या एक्झिट पोलनुसार, नागपूर महापालिकेत भाजपचा मोठा विजय मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

एक्झिट पोलनुसार, 151 जागांच्या महापालिकेत भाजपला 98 ते 110 दरम्यान जागा मिळवत भाजप स्पष्ट बहुमत मिळवेल असं भाकित वर्तवलं आहे. तर काँग्रेसच्या जागा 35 ते 41 दरम्यान राहण्याची शक्यता आहे. तर स्वतंत्र लढलेल्या शिवसेनेला केवळ 2 ते 4 जागा मिळतील, असा अंदाज वर्तवला आहे.
पुणे-
भाजप -77-85
काँग्रेस एनसीपी- 60-66
शिवसेना- 10-13
मनसे- 3-6
इतर- 1-3

PUNE_POLL

अॅक्सिस आणि इंडिया टुडेच्या एक्झिट पोलनुसार, पुणे महापालिकेत राष्ट्रवादीला धक्का बसण्याची शक्यता आहे. इथेही भाजप मोठा पक्ष ठरण्याची चिन्हं आहेत.

पुणे महापालिकेत भाजपला 77 ते 85 जागा मिळतील, असा अंदाज वर्तवला जात आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीला 60 ते 66 जागा मिळतील. तर शिवसेनेला 10 ते 13 जागांमध्ये समाधान मानावं लागण्याची शक्यता अॅक्सिस-इंडिया टुडेच्या एक्झिट पोलमध्ये वर्तवली आहे. तसंच मनसेला 3 ते 6 आणि इतरांना 1 ते जागा मिळण्याचा अंदाज आहे.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
अधिक माहिती: BMC Election-2017
First Published:
LiveTV