मुंबईत रुफ टॉप हॉटेलांना अखेर महापालिकेची परवानगी

महापालिकेत सादर झालेली पॉलिसी सभागृहात अडकली होती. मात्र त्यात बदल करुन अखेर रुफटॉप हॉटेल पॉलिसीला आयुक्तांनी मंजुरी दिली

मुंबईत रुफ टॉप हॉटेलांना अखेर महापालिकेची परवानगी

मुंबई : मुंबईत गच्चीवरील हॉटेलांना अखेर परवानगी देण्यात आली आहे. मुंबई महापालिकेचे आयुक्त अजॉय मेहता यांनी मंजुरी दिली.

रुफटॉप हॉटेल्स हा शिवसेनेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. यासंदर्भात महापालिकेत सादर झालेली पॉलिसी सभागृहात अडकली होती. मात्र त्यात बदल करुन अखेर रुफटॉप हॉटेल पॉलिसीला आयुक्तांनी मंजुरी दिली आहे.

रुफटॉप हॉटेलपासून 10 मीटर अंतरावर कोणतीही निवासी इमारत नसावी, अशी अट घालण्यात आली आहे. तसंच मॉल आणि लॉजिंग भागात रुफटॉप हॉटेलला परवानगी आहे. अशा काही बाबी पॉलिसीत सामाविष्ट करण्यात आल्या आहेत.

या निर्णयानंतर युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांना महापालिकेचे आभार मानले आहेत

https://twitter.com/AUThackeray/status/925707606743711744

https://twitter.com/AUThackeray/status/925707830648242177

https://twitter.com/AUThackeray/status/925719867193544704

https://twitter.com/AUThackeray/status/925720745556115456

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: BMC gives Permission to Roof top hotels in Mumbai latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV