कमला मिल आगीनंतर बीएमसीला जाग, आदेशांची सरबत्ती

कमला मिल आग प्रकरणानंतर महापालिकेला जाग आली असून, मुंबईभर कारवाईचं सत्र सुरु केलं आहे.

कमला मिल आगीनंतर बीएमसीला जाग, आदेशांची सरबत्ती

मुंबई : कमला मिल्स कंपाऊंडमधील आगीनंतर मुंबई महापालिकेला जाग आली आहे. मुंबईतील आस्थापनांना सुरक्षिततेसंदर्भातील नियमांबाबत आदेशांवर आदेश देण्यास पालिकेने सुरुवात केली आहे.

येत्या 15 दिवसांत अग्नीसुरक्षा आणि नियमांची पूर्तता स्वत:हून करा, नाहीतर पुन्हा कारवाईला सामोरे जा, असा इशारा मुंबई महापालिकेने आस्थापनांना दिला आहे.

कमला मिल आग प्रकरणानंतर महापालिकेला जाग आली असून, मुंबईभर कारवाईचं सत्र सुरु केलं आहे.

मुंबई महापालिकेची सुरु असलेली कारवाई अशीच कायम राहील. मात्र, येत्या 15 दिवसांत ज्यांना अटींआधारीत परवानगी दिली आहे, अशा आस्थापनांनी स्वत:हून अनधिकृत बांधकामे आणि इतर गोष्टी निष्कासीत केल्या नाहीत, तर पुन्हा पालिकेचा हतोडा पडेल, असा इशारा महापालिका आयुक्तांनी दिला आहे.

तसेच, ज्या आस्थापनांमध्ये अनियमितता आढळून आली, त्यांच्यावर कारवाई करण्यात दिरंगाई का झाली?, याचा तपास उपायुक्तांनी करावा, असा आदेशही देण्यात आला आहे.

या चौकशी दरम्यान अनधिकृत आस्थापनांचे मालक आणि अधिकारी यांचे संगनमत होते का? तसेच, अग्निशमन दलातील अधिकाऱ्यांनी नियम तोडणाऱ्यांकडे दुर्लक्ष केले का? याबाबत माहिती देण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. शिवाय, अशा अधिकाऱ्यांची आणि आस्थापनांची नावे थेट आयुक्तांना कळवण्याचे आदेश दिले आहेत.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: BMC orders about safety checking latest updates
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV