महापालिकेकडून लालबागचा राजा मंडळाला 4.86 लाखांचा दंड

लालबागचा राजा गणेश मंडळाला मुंबई महापालिकेनं 4 लाख 86 हजारांचा दंड ठोठावून मोठा दणका दिला आहे.

महापालिकेकडून लालबागचा राजा मंडळाला 4.86 लाखांचा दंड

मुंबई : लालबागचा राजा गणेश मंडळाला मुंबई महापालिकेनं 4 लाख 86 हजारांचा दंड ठोठावून मोठा दणका दिला आहे. गणेशोत्सव काळात रस्त्यांवर खड्डे खोदल्यामुळे त्यांना हा दंड ठोठावण्यात आला आहे.

लालबाग परिसरात रस्त्यावर 243 खड्डे खोदल्यामुळे एफ दक्षिण विभागानं ही कारवाई केली आहे. प्रत्येक खड्ड्यासाठी 2 हजार रुपये यानुसार हा दंड आकारण्यात आला आहे.

दरम्यान, मुंबईकर आधीच पावसामुळे झालेल्या खड्ड्यांमुळे त्रस्त झालेले असताना दुसरीकडे लालबागचा राजा मंडळानं रस्त्यावर खड्डे खोदून यात आणखी भर घातली आहे. त्यामुळेच त्यांच्यावर पालिकेच्या वतीनं ही दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV