राज ठाकरे, आमीरच्या घराबाहेर फेरीवाला क्षेत्र, 'मातोश्री'बाहेर मात्र बंदी

पण उद्धव ठाकरेंचं निवासस्थान असलेल्या 'मातोश्री' बाहेर मात्र फेरीवाल्यांना बंदी असेल.

राज ठाकरे, आमीरच्या घराबाहेर फेरीवाला क्षेत्र, 'मातोश्री'बाहेर मात्र बंदी

मुंबई : मुंबई महापालिकेने फेरीवाल्यांसाठी हॉकर्स झोन तयार केलं आहे. यामध्ये दिग्गज सेलिब्रेटींच्या घराबाहेर फेरीवाल्यांना बसण्यासाठी हक्काचं ठिकाण मिळणार आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या 'कृष्णकुंज' निवासाप्रमाणे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सर्वेसर्वा नारायण राणे, अभिनेता आमीर खान आणि संजय दत्त यांच्या घराबाहेर फेरीवाल्यांना महापालिकेने जागा देण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. पण उद्धव ठाकरेंचं निवासस्थान असलेल्या 'मातोश्री' बाहेर मात्र फेरीवाल्यांना बंदी असेल.

नव्या धोरणानुसार दादरमधील शिवसेना भवनासमोर 100, दादरमधील मुंबई भाजप कार्यालय असलेल्या फाळके रोडवर 310 फेरीवाल्यांना बसण्यास संमती देण्यात आली आहे.

दरम्यान, पूर्वी ज्या ठिकाणी फेरीवाले नव्हते, त्या ठिकाणी फेरीवाल्यांना बसवण्यास मनसेचा विरोध आहे.

कुठे कुठे फेरीवाल्यांच्या जागा प्रस्तावित?

मुंबई महापालिकेकडून 1366 रस्ते फेरीवाला क्षेत्र म्हणून प्रस्तावित

85 हजार 891 फेरीवाल्यांच्या जागा प्रस्तावित

फेरीवाला क्षेत्रासाठी 10 फुटांचा फूटपाथ आवश्यक

शाळा, धार्मिक स्थळं, रुग्णालयांपासून 100 मीटर अंतरावर फेरीवाला क्षेत्र होणार नाही

रेल्वे स्टेशनपासून 150 मीटर अंतरावर फेरीवाला क्षेत्र होणार नाही

अभिनेता आमीर खानचं निवासस्थान असलेल्या हिल रोड 12वा रस्ता, या ठिकाणी 10 फेरीवाल्यांसाठी जागा

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते नारायण राणेंच्या जुहूतील तारा रोड परिसरात घराबाहेर 36 फेरीवाले प्रस्तावित

अभिनेता संजय दत्तचे निवासस्थान असलेल्या पाली हिल रस्त्यावर 10 फेरीवाल्यांसाठी जागा

'कृष्णकुंज'बाहेरील दोन रस्त्यांवर प्रत्येकी 10 असे 20 फेरीवाले प्रस्तावित

'राजगड'बाहेरील रस्त्यावर 200 फेरीवाल्यांसाठी जागा प्रस्तावित

दादरमध्ये नियमानुसार अत्यंत तुरळक फेरीवाल्यांना जागा प्रस्तावित

दादर-धारावीमधील जी नॉर्थ विभागात 4 हजार 455 फेरीवाल्यांसाठी जागा प्रस्तावित

तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानाबाहेरचा परिसर मात्र नो हॉकर्स झोनमध्ये

पाहा व्हिडीओ

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: BMC proposes hawking zones near Raj Thackeray, Aamir Khan, Narayan Rane’s bungalow
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV