भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यावर सट्टा, बॉलिवूड अभिनेत्याचा मेहुणा अटकेत

मुंबई पोलिस आयुक्तांनी सटोरिया म्हणजेच सट्टा लावणारे आणि पंटर म्हणजेच सट्टा खेळणाऱ्यांवरही कारवाई करण्याचा आदेश दिला होता.

भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यावर सट्टा, बॉलिवूड अभिनेत्याचा मेहुणा अटकेत

मुंबई : मुंबई क्राईम ब्रान्चने क्रिकेट बेटिंग रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील क्रिकेट सामन्यावेळी सट्टेबाजी केल्याप्रकरणी सहा जणांना अटक केली आहे. या रॅकेटमध्ये प्रसिद्धी बॉलिवूड अभिनेत्याच्या मेहुण्याचा समावेश आहे.

अमित अजित गिल असं त्याचं नाव आहे. मुंबई पोलिस आयुक्तांनी सटोरिया म्हणजेच सट्टा लावणारे आणि पंटर म्हणजेच सट्टा खेळणाऱ्यांवरही कारवाई करण्याचा आदेश दिला होता. त्या अंतर्गतच अमित अजित गिलविरोधात कारवाई झाली आहे. त्यामुळे अमितच्या अटकेनंतर अभिनेत्याचीही चौकशी होऊ शकते.

Australi_India_Match

मागील एका महिन्यापासून मुंबईत सट्टेबाजांविरोधात सातत्याने कारवाई सुरु आहे. गेल्या आठवड्यात ठाणे आणि भांडुपमध्ये डझनभर बुकींना पकडलं होतं. मागच्या महिन्यात वांद्रे क्राईम ब्रान्चनेही सहा सट्टेबाजांना अटक केली होती. अभिनेत्याचा मेहुणा अटकेतील सहा आरोपींच्या संपर्कात होता, असं कळतं.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV