भिवंडीत इमारत कोसळली, चौघांचा मृत्यू, इमारतीचा मालक अटकेत

सकाळी साडेआठच्या सुमारास इमारत कोसळण्याची दुर्घटना घडली.

भिवंडीत इमारत कोसळली, चौघांचा मृत्यू, इमारतीचा मालक अटकेत

भिवंडी (मुंबई) : भिवंडी इमारत दुर्घटनेत मृतांचा आकडा चौघांवर पोहोचला आहे. तर 8 जण जखमी असून त्यांच्यावर इंदिरा गांधी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीस आणि अग्निशमन दलाच्या मदतीने इमारतीतील सर्व रहिवाशांना बाहेर काढण्यात आलं आहे.

आज (शनिवार) पहाटे या दुर्घटनेतल्या ढिगाऱ्याखालूनही एका महिलेचा मृतदेह काढण्यात आला. रूक्सार खान, अश्फाक खान आणि जैबुन्निसा अन्सारी अशी मृतांची नावं आहेत तर पहाटे काढण्यात आलेल्या महिलेचं नाव अद्याप कळू शकलं नाही. तर 8 जण या दुर्घटनेत जखमी झाले आहेत. त्यांच्यावर गांधी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

भिवंडीच्या नवी वस्ती भागात काल (शुक्रवार) सकाळी 4 मजली इमारत कोसळली. या इमारतीमध्ये एकूण 7 कुटुंब राहत असल्याची माहिती आहे. दरम्यान इमारतीचा मालक ताहीर अन्सारी याला पोलिसांनी अटक केली आहे.

अग्निशमन दल, पोलीस आणि स्थानिक नागरिकांकडून बचावकार्य सुरु आहे. एनडीआरएफची दोन पथकं घटनास्थळाकडे रवाना झाली असून, एनडीआरएफच्या पथकाला लवकरात लवकर पोहोचता यावं, यासाठी ग्रीन कॉरिडोअर तयार करण्यात आले होते.

https://twitter.com/ANI/status/933910941959204865

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Building collapsed in Bhiwandi latest updates
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV