राणेंच्या रिक्त विधानपरिषदेच्या जागेसाठी 7 डिसेंबरला पोटनिवडणूक

21 सप्टेंबर रोजी नारायण राणे यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देताना आमदारकी सोडली होती.

राणेंच्या रिक्त विधानपरिषदेच्या जागेसाठी 7 डिसेंबरला पोटनिवडणूक

मुंबई : नारायण राणेंनी विधानपरिषदेच्या आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी सात डिसेंबरला पोटनिवडणूक होणार आहे. सात तारखेलाच निकाल जाहीर होणार आहे. काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर राणेंनी आमदारकीचा राजीनामा दिला होता.

21 सप्टेंबर रोजी नारायण राणे यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देताना आमदारकी सोडली होती. 12 वर्षात काँग्रेसमध्ये झालेली ससेहोलपट, खदखद त्यावेळी राणेंनी व्यक्त केली होती.

नारायण भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या चर्चा सुरु असतानाच त्यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना करत एनडीएला पाठिंबा जाहीर केला.

सभापतींकडे राणेंनी विधानपरिषदेच्या आमदारकीचा राजीनामा पाठवला होता. 7 जुलै 2022 पर्यंत विधानपरिषदेच्या या आमदारकीची टर्म आहे.

मतदान कार्यक्रम

अधिसूचना जारी करण्याची तारीख - 20 नोव्हेंबर 2017
नामनिर्देशनाची अंतिम मुदत - 27 नोव्हेंबर 2017
अर्जांची छाननी - 28 नोव्हेंबर 2017
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत - 30 नोव्हेंबर 2017
मतदान - 7 डिसेंबर 2017 - सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत
मतमोजणी - 7 डिसेंबर 2017 - संध्याकाळी 5 वाजता

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Bye-polls for MLC due to resignation of Narayan Rane latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV