मुंबईतल्या हाजी अली दर्ग्याजवळ कारचा भीषण अपघात

रस्त्यालगतचे लोखंडी बॅरिकेट तोडून ही कार कठडावरुन थेट समुद्रकिनारी आदळली. हा अपघात एवढा भीषण होता की, यामध्ये कारचा अक्षरश: चुराडा झाला.

मुंबईतल्या हाजी अली दर्ग्याजवळ कारचा भीषण अपघात

मुंबई : मुंबईतल्या प्रसिद्ध हाजी अली दर्ग्याजवळच्या समुद्रकिनारी काल  (बुधवार)  रात्री कारचा भीषण अपघात घडला. याप्रकरणी 35 वर्षीय कार चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

एक लाल रंगाची वॅगन आर कार कठडा ओलांडून समुद्र किनाऱ्याजवळ उलटली.  कारची अवस्था पाहून ती किती वेगानं पलटली असेल याची पुरेपुर कल्पना येते. मध्यरात्री दोन ते अडीच दरम्यान हा अपघात झाल्याचं समजतं आहे.

रस्त्यालगतचे लोखंडी बॅरिकेट तोडून ही कार कठडावरुन थेट समुद्रकिनारी आदळली. हा अपघात एवढा भीषण होता की, यामध्ये कारचा अक्षरश: चुराडा झाला. दरम्यान, अपघातात काही जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे.

VIDEO : 

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV