पालघरमध्ये कारचा भीषण अपघात, पाच जणांचा जागीच मृत्यू

पालघर-माहिम रोडवरील पाटीलवाडी येथे कारचा भीषण अपघात झाल्याचं प्राथमिक वृत्त नुकतंच हाती येत आहे. या कारमधील पाचही जणांचा जागीच मृत्यू झाल्याचं समजतं आहे.

पालघरमध्ये कारचा भीषण अपघात, पाच जणांचा जागीच मृत्यू

पालघर : पालघर-माहिम रोडवरील पाटीलवाडी येथे कारचा भीषण अपघात झाल्याचं प्राथमिक वृत्त नुकतंच हाती येत आहे. या कारमधील पाचही जणांचा जागीच मृत्यू झाल्याचं समजतं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, माहिमहून पालघरकडे जात असताना पहाटे चारच्या सुमारास या कारला भीषण अपघात झाला. चालकाचं नियंत्रण सुटल्याने गाडी थेट एका मोठ्या झाडावर जाऊन आदळली. ज्यामध्ये कारचा अक्षरश: चुराडा झाला. या अपघातात चालकासह कारमधील पाचही जणांचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पाच जणांपैकी तीन मृतांची ओळख पटविण्यात आली असून उर्वरित दोघांची ओळख पटविण्याचं काम सध्या सुरु आहे.

मृतांची नावे :

  1. किरण पागधरे

  2. निकेश तामोरे

  3. विराज अरेकर


हे तिघेही तारापूरचे रहिवासी असल्याची माहिती समजते आहे.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Car accidents in Palghar five deaths latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV